ईव्हीएम मशिन्सचा विजय असो, भाजपच्या विजयावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

ईव्हीएम मशिन्सचा विजय असो, भाजपच्या विजयावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

गुजरात निवडणुकीच्या वेळीही राज ठाकरे यांनी ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेतला होता.

  • Share this:

मुंबई, 15 मे : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपने काँग्रेसचा धुव्वा उडवत विजय मिळवलाय. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचा’ विजय असो अशी सूचक प्रतिक्रिया प्रतिक्रियाला दिली.

मोदी करिश्मा पुन्हा एकदा कर्नाटक निवडणुकीत पाहण्यास मिळालाय. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय. भाजपचा हा ऐतिहासिक विजय आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी न्यूज18 लोकमतने संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी या भाजपच्या विजयावर आपल्या शैलीत प्रतिक्रिया दिली. हा विजय म्हणजे ईव्हीएम मशीनचा आहे. कर्नाटकात भाजपचा विजय़ म्हणजे एव्हीएमचा विजय आहे. त्यामुळे आपण इलेक्ट्राॅनिक व्होटिंग मशिन्सचा विजय असो असं म्हणूयात अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली. त्यानंतर राज ठाकरे यांनी टि्वटही केलं.

गुजरात निवडणुकीच्या वेळीही राज ठाकरे यांनी ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेतला होता. गुजरातमध्ये सध्या काँग्रेसचा ट्रेंड आहे. जर गुजरातचा मोठा विजय झाला तर हा करिश्मा ईव्हीएम मशीनचा असेल असा संशय राज ठाकरे यांनी व्यक्त केला होता.

First published: May 15, 2018, 12:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading