डोंबिवलीत मनसे आणि पोलिसांमध्ये झटापट... प्रतिकात्मक EVM मशीन केले जप्त

डोंबिवलीत मनसे आणि पोलिसांमध्ये झटापट... प्रतिकात्मक EVM मशीन केले जप्त

'EVM हटवा, लोकशाही वाचवा', असे टी शर्ट घालून मनसे कार्यकर्ते EVM ची हंडी फोडण्यासाठी डोंबिवलीच्या मानपाडा चौकात पोहोचले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात आहे.

  • Share this:

प्रदीप भणगे,(प्रतिनिधी)

डोंबिवली,24 ऑगस्ट- डोंबिवलीच्या मानपाडा चौकात मनसे कार्यकर्त्यांनी प्रतिकत्मक EVM हंडीचा बांधण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान पोलिसांनी प्रतिकात्मक EVM मशीन केली जप्त केली. यावरून मनसे आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. डोंबिवलीतील चार रस्ता येथे हा प्रकार घडला. मोदी सरकार हाय हाय... मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणा दिल्या.

मनसेने दिली 'ही' उपमा..

'EVM हटवा, लोकशाही वाचवा', असे टी शर्ट घालून मनसे कार्यकर्ते EVM ची हंडी फोडण्यासाठी डोंबिवलीच्या मानपाडा चौकात पोहोचले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात आहे. मनसेचे शहराध्यक्ष राजेश कदम यांनी मोदी सरकारला कंसाची उपमा दिली आहे. ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने कंसाचा वध केला, तसाच आम्ही 'कृष्णकुंज'चे गोपी आणि गोपिका मोदी सरकाररुपी कंसाचा निषेध करत असल्याचे कदम यांनी सांगितले. मनसेने 'EVM हटवा, लोकशाही वाचवा' हा नारा देऊन आंदोलन सुरू केले आहे. त्याची एक प्रतिकात्मक EVM ची दहीहंडी मनसेचे पदाधिकारी साजरी करत आहे. त्यातून 'कृष्णकुंज'चे गोपी आणि गोपिका दही आणि लोणी लाटणार असल्याचे कदम यांनी सांगितले.

मनसे EVM दहीहंड फोडणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मनसेचे शहराध्यक्ष राजेश कदम यांना नोटीस बजावली होती. फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम 149 प्रमाणे राजेश कदम यांनी ही नोटीस बजावण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले होते. पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली असतानाही हंडी फोडणार असल्याचा इशारा मनसेने दिला आहे. या पार्श्वभूमीवर डोंबिवलीच्या मानपाडा चौकात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. 'EVM हटवा, लोकशाही वाचवा', असे टी शर्ट परिधान करून मनसे कार्यकर्ते EVM हंडी फोडण्यासाठी मानपाडा चौकात पोहोचले आहेत. त्यांनी EVM हंडीचे विधीवत पूजन केले. त्यानंतर पोलिसांनी ही करवाई केली.

पूरग्रस्तांना 2 लाख 51 हजारांची मदत..

डोंबिवलीच्या मानपाडा चौकात मनसेची दहीहंडी मोठ्या जल्लोषात फुटते. परंतु यंदा कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पूरस्थिती उद्भवली आहे. मनसेने दहीहंडीला होणारा कार्यक्रम यंदा रद्द करून पूरग्रस्तांना 2 लाख 51 हजार रुपयांची मदत पाठवली आहे.

VIDEO: मुख्यमंत्र्यांचा खासदार सुप्रिया सुळेंवर पलटवार; प्रश्नाला दिलं 'हे' उत्तर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: EVM
First Published: Aug 24, 2019 12:56 PM IST

ताज्या बातम्या