डोंबिवलीत मनसे फोडणार EVM दहीहंडी.. शहराध्यक्षांना पोलिसांनी बजावली नोटीस

पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली असतानाही हंडी फोडणार असल्याचा इशारा मनसेने दिला आहे. या पार्श्वभूमीवर डोंबिवलीच्या मानपाडा चौकात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 24, 2019 11:43 AM IST

डोंबिवलीत मनसे फोडणार EVM दहीहंडी.. शहराध्यक्षांना पोलिसांनी बजावली नोटीस

प्रदीप भणगे, (प्रतिनिधी)

डोंबिवली, 24 ऑगस्ट- डोंबिवलीत मनसे EVM दहीहंड फोडणार आहे. या प्रकरणी पोलिसांनी मनसेचे शहराध्यक्ष राजेश कदम यांना नोटीस पाठवली. फोजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम 149 प्रमाणे राजेश कदम यांनी ही नोटीस बजावण्यात आली आहे. 'EVM हटवा, लोकशाही वाचवा', असे टी शर्ट परिधान करून मनसे कार्यकर्ते EVM हंडी फोडण्यासाठी मानपाडा चौकात पोहोचले आहेत.

तरी हंडी फोडणार, मनसेचा इशारा...

पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली असतानाही हंडी फोडणार असल्याचा इशारा मनसेने दिला आहे. या पार्श्वभूमीवर डोंबिवलीच्या मानपाडा चौकात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. डोंबिवलीच्या मानपाडा चौकात मनसेची दहीहंडी मोठ्या जल्लोषात फुटते. परंतु यंदा कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पूरस्थिती उद्भवली आहे. मनसेने दहीहंडीला होणारा कार्यक्रम यंदा रद्द करून पूरग्रस्तांना 2 लाख 51 हजार रुपयांची मदत पाठवली आहे.

राज ठाकरेंची चौकशी करणाऱ्या EDला 'मनसे'ची नोटीस!

Loading...

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची चौकशी करणाऱ्या ED लाच आता 'मनसे'ने नोटीस पाठवली आहे. ईडीच्या कार्यालयावर असलेले फलक हे हिंदी आणि इंग्रजीत आहेत. ते मराठीत असायला पाहिजे, अशी मागणी 'मनसे'ने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. महाराष्ट्रात असलेल्या सरकारी कार्यालयांवरचे फलक हे मराठीतच पाहिजे, असा नियम आहे. त्यामुळे 'मनसे'ने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करत त्याची एक प्रत ईडीला पाठवली आहे. आता राज्याच्या मराठी भाषा विभागाने त्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी 'मनसे'ने केली आहे.

'मनसे'ने याआधीही मराठी फलकांसाठी मुंबईत जोरदार आंदोलन केले होते. हे आंदोलन खास 'मनसे' स्टाईल झाल्याने अनेक दुकाने आणि संस्थांच्या पाट्या बदलल्या होत्या. ईडी सरकारच्या निर्देशानुसार कारवाई करत असल्याचा आरोप मनसेने केला होता. त्या पार्श्वभूमीवर जाणीवपूर्वक 'मनसे'ने ईडी विरोधात ही तक्रार दिली आहे.

तब्बल पावणे नऊ तासांच्या चौकशी

राज ठाकरे गुरुवारी रात्री 8 वाजून 16 मिनिटांनी ईडीच्या कार्यालयाबाहेर पडले. तब्बल पावणे नऊ तास त्यांची चौकशी चालली. राज ठाकरे यांनी चौकशीसाठी ईडीला पूर्ण सहकार्य केल्याचे सूत्रांनी सांगितले. राज ठाकरेंना पुन्हा चौकशीला बोलावण्यात येणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, ईडीच्या कार्यालयाबाहेर संध्याकाळी मनसे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. राज ठाकरेंचे कुटुंबीयसुद्धा त्यांच्या बाहेर येण्याची वाट पाहत त्याठिकाणी हजर होते. ईडीच्या कार्यालयाबाहेर आल्यानंतर राज ठाकरे कुटुंबीयांसोबत कृष्णकुंकडे रवाना झाले. कृष्णकुंजवर आल्यानंतर त्यांनी आक्रमक प्रतिक्रिया व्यक्त केली. अशा नोटीसा देऊन माझं तोंड बंद करण्याचा कुणी प्रयत्न केल्यास तोंड बंद होणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली होती.

भाजप प्रवेशाबाबत उदयनराजे भोसले काय म्हणाले? पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 24, 2019 11:39 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...