• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • 'संधी सगळ्यांना मिळते', भाजप नेत्यांच्या मनसेच्या अविनाश जाधवांना पाठिंबा

'संधी सगळ्यांना मिळते', भाजप नेत्यांच्या मनसेच्या अविनाश जाधवांना पाठिंबा

'शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा मुलगा दारू पिऊन पोलिसांना धमकी देतो तरी त्याच्यावर साधी तक्रार नाही?'

 • Share this:
  मुंबई, 04 ऑगस्ट : मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. अविनाश जाधव यांना ठाण्यातून 2 वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. अविनाश जाधव यांना पाठिंबा देण्यासाठी भाजपचे नेते निलेश राणे समोर आले आहे. निलेश राणे यांनी ट्वीट करून जाहीरपणे अविनाश जाधव यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्याचबरोबर त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. 'मनसेचे नेते अविनाश जाधव यांना आंदोलन करताना अटक करण्यात आली आणि दोन वर्षाची तडीपारी लावली. दुसऱ्या बाजूला शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा मुलगा दारू पिऊन पोलिसांना धमकी देतो तरी त्याच्यावर साधी तक्रार नाही. एक गोष्ट राज्य सरकारने विसरू नये, संधी सगळ्यांना मिळते' अशा शब्दात निलेश राणेंनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. अविनाश जाधव यांनी गेल्या अनेक वर्षांपासून ठाण्यात विविध विषयांवर आंदोलनं केली आहे. कधी कधी ज्यांना आंदोलनाची भाषा समजली नाही अशांना मनसेच्या खळ्ळ खट्यॉक स्टाईलने उत्तर दिले आहे. अलीकडेच त्यांनी  ठाणे महापालिकेच्या कोविड रुग्णालयात परिचारिकेला कामावरून काढून टाकण्यात आले आहे. यामुळे अविनाश जाधव यांनी आंदोलन केले होते. या आंदोलनाच्या दरम्यान, अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. अविनाश जाधव यांच्यावर थेट कारवाई करत 2 वर्षांसाठी ठाण्यातून तडीपार करण्यात आले आहे. अविनाश जाधव यांच्यावर 356 चे कलम लावण्यात आलं आहे. त्यांना 3 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीही सुनावण्यात आली होती. कोर्टात धाव घेतली असता अद्याप जामीन मिळू शकला नाही. या प्रकरणावर 6 ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे.
  Published by:sachin Salve
  First published: