मुंबई विद्यापीठ विचारते, 'कायदा गाढव, वकील फसवणूक करणारे.. तर न्यायाधीश यावर औषध आहे का?'

मुंबई विद्यापीठ विचारते, 'कायदा गाढव, वकील फसवणूक करणारे.. तर न्यायाधीश यावर औषध आहे का?'

धार्मिक विश्वास आणि पद्धती तुम्हाला नरकात घेऊन जातात याचे उत्तर देऊन कारणे द्या असा प्रश्न विद्यापीठाने विचारला.

  • Share this:

मुंबई,27 मार्च : गेल्या दोन वर्षात अनेकदा मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. परीक्षेचे निकालातील त्रुटी आणि त्यानंतर कुलगुरुंच्या राजीनाम्यापर्यंत विद्यापीठ चर्चेत राहिले आहे. आताही शासकीय विधी महाविद्यालयाच्या पदवी परीक्षेत विचारलेल्या धक्कादायक अशा प्रश्नाने पुन्हा विद्यापीठावर टीकेची झोड उठली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या शासकीय विधी महाविद्यालयाची 16 मार्च रोजी परीक्षा घेण्यात आली. यात विचारण्यात आलेल्या प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांसह वकीलसुद्धा आश्चर्यचकीत झाले आहेत. कायदा गाढव, वकील फसवणूक करणारे, लबाड तर न्यायाधीश यावर औषध आहे का? असा प्रश्न परीक्षेत विचारला गेला. जर अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले तर कायद्याकडे पाहण्याचा विद्यार्थ्यांचा दृष्टीकोन कसा होईल? त्याकडे व्यवसायाचा चांगला पर्याय म्हणून कसे पाहतील? असे प्रश्न विद्यार्थ्यांमधून विचारले जात आहेत.

फक्त एकाच प्रश्नावर नाही तर इतरही काही प्रश्नांवर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला आहे. यात वकिली व्यवसायात येणाऱ्या मुलांचे शोषण केले जाते याची कल्पना असतानाही ते या व्यवसायात का येतात? असाही प्रश्न विचारला होता. तसेच धार्मिक विश्वास आणि पद्धतीने तुम्ही नरकात जाता याचेही कारणांसह उत्तर द्या असे म्हटले होते.

याबाबत स्टुडंट लॉ असोसिएशनने परीक्षेत असे प्रश्न विचारलेच कसे? आणि कोणी?  याची चौकशी समितीची नेमणूक करून तपास करण्याची मागणी केली आहे. यासाठी कुलगुरु, उच्च न्यायलयाचे मुख्य न्यायाधीश, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य यांना पत्र पाठवण्यात आले आहे. दरम्यान, याप्रकरणाची माहिती घेण्यासाठी विधी महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही.

VIDEO: 'मराठी मुलगी आहे, पाहिजे तेव्हा मला तलवार काढता येते'

iframe id="story-355885" class="video-iframe-bg-color iframe-onload" src="https://lokmat.news18.com/embed/videos/MzU1ODg1/" width="100%" height="150" frameborder="0" scrolling="no"></iframe

First published: March 27, 2019, 9:59 AM IST

ताज्या बातम्या