Home /News /mumbai /

कसाबच्या वेळी सुद्धा एवढी सुरक्षा नव्हती, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना सणसणीत टोला

कसाबच्या वेळी सुद्धा एवढी सुरक्षा नव्हती, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना सणसणीत टोला

कसाबच्या वेळीसुद्धा एवढी सुरक्षा नव्हती. इतकी भीती कशाची होती. काय कुणी पळून जाणार होतं का?

कसाबच्या वेळीसुद्धा एवढी सुरक्षा नव्हती. इतकी भीती कशाची होती. काय कुणी पळून जाणार होतं का?

कसाबच्या वेळीसुद्धा एवढी सुरक्षा नव्हती. इतकी भीती कशाची होती. काय कुणी पळून जाणार होतं का?

  मुंबई, 03 जुलै :  एकनाथ शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर आता विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक (Assembly Speaker Election )  आज होणार आहे. एकनाथ शिंदे (eknath shinde)गटाचे आमदार कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत विधानभवनात आणण्यात आले होते. एखाद्या अतिरेक्याला सुद्धा असं आणलं जात नाही. कसाबच्या  वेळीसुद्धा एवढी सुरक्षा नव्हती. इतकी भीती कशाची होती. काय कुणी पळून जाणार होतं का? असा सणसणीत टोला शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आज पार पडत आहे. सुरत, गुवाहाटी, गोवा वारी करून अखेर एकनाथ शिंदे गटाचे आमदार आज विधानभवनामध्ये दाखल झाले आहे. एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांना बसमधून विधानभवनात आणण्यात आले आहे. यावेळी माध्यमांशी बोलत असताना आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. एखाद्या अतिरेक्याला सुद्धा असं आणलं जात नाही. कसाबच्या  वेळीसुद्धा एवढी सुरक्षा नव्हती. इतकी भीती कशाची होती. काय कुणी पळून जाणार होतं का? विधानभवनात आमदार हा सर्वात जास्त सुरक्षित असतो. पण इथंही कडक सुरक्षा लावण्यात आली आहे. आम्ही काही आमदार गुवाहाटीला पळवून नेणार नाही. कसाबच्या वेळी सुद्धा इतकी सुरक्षा नव्हती, असं टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला. 'शिवसेनेकडून व्हीप बजावला आहे. तोच लागू असणार असणार आहे. आमचे आमदार आहे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमच्यासोबत एका कुटुंब म्हणून सोबत राहिले. त्यांच्यासोबतच आम्ही बसणार आहोत, असंही आदित्य ठाकरे म्हणाले. 'आज आरेच्या जंगलामध्ये आंदोलन केले जात आहे. मीही त्या आंदोलनाला जाणार होतो. पण, अधिवेशन असल्यामुळे मला जाता आले नाही. पण, सरकारला माझी विनंती आहे की, आमच्यावर असलेला राग  मुंबईवर काढू नका, आम्हाला धोका दिला, पण आता मुंबईला धोका देऊ नका. आरेची जागा ही कांजूरमार्ग हा पर्याय दिला आहे. त्याच्यावर काम सुरू आहे. सत्तेवर आल्यावर प्रत्येक जण हे आप-आपला विचार करत असतो. पण मुंबईचा विचार करा. मुंबईचा विचार करण्याची गरज आहे, असंही आदित्य ठाकरे म्हणाले. 'पक्ष कार्यालयाची चावी ही आमच्याकडे आहे. आम्ही तर कार्यालय सील केलं. त्यांनी तर आमचे आमदार सील केले आहे. आज अध्यक्षपदाची निवड होईल. आमच्यासोबत किती आणि त्यांच्याकडे किती आमदार आहे. आज विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक शिवसैनिक आहे राजन साळवी आणि दुसरा माजी शिवसैनिक आहे. मग शिवसेनेला काय मिळालं? असा सवालही आदित्य ठाकरेंनी विचारला.
  Published by:sachin Salve
  First published:

  Tags: Maharashtra News

  पुढील बातम्या