मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /राज ठाकरेंच्या भूमिकेनंतरही मनसेचे आमदार राजू पाटील उतरणार 'नवी मुंबई'च्या आंदोलनात!

राज ठाकरेंच्या भूमिकेनंतरही मनसेचे आमदार राजू पाटील उतरणार 'नवी मुंबई'च्या आंदोलनात!

'राज ठाकरे यांनी नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाबाबत वस्तुनिष्ठ तांत्रिक बाजू मांडली आहे. त्यानंतर अनेकजण विपर्यास करुन...'

'राज ठाकरे यांनी नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाबाबत वस्तुनिष्ठ तांत्रिक बाजू मांडली आहे. त्यानंतर अनेकजण विपर्यास करुन...'

'राज ठाकरे यांनी नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाबाबत वस्तुनिष्ठ तांत्रिक बाजू मांडली आहे. त्यानंतर अनेकजण विपर्यास करुन...'

मुंबई, 24 जून : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackery) यांनी नवी मुंबई विमानतळाच्या नामांतरावर (navi mumbai airport name controversy) तोडगा काढत छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव उचित असल्याची भूमिका मांडली होती. एवढंच नाहीतर आता रस्त्यावर कोण उतरणार हे बघूया, असा इशाराही दिला होता. पण, आज नवी मुंबईत लाखोंच्या संख्येनं निघणाऱ्या मोर्च्यात सहभागी होणार असल्याची घोषणाच मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील (mns mla raju patil) यांनी केली आहे.

नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्याच्या मागणी जोर धरू लागली आहे. 3 दिवसांपूर्वी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी कृष्णकुंजवर जाऊन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. मनसेनं पाठिंबा द्यावा, अशी मागणी केली होती. परंतु, राज ठाकरे यांनी वस्तुस्थितीत मांडत नवी मुंबईतील विमानतळ हा मुंबई विमानतळाचा विस्तार आहे, त्यामुळे त्या विमानतळाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज हेच राहणार आहे, असं सांगितलं. तसंच, आता  'आज महाराजांच्या नावावर चर्चा काय करायची. विमानतळ पहिल्यांदा झालं पाहिजे. आता माझ्या बोलण्यानंतर कोण रस्त्यावर उतरतंय ते बघूया, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला होता.

सूर्याला झालंय तरी काय? अनेकांना दिसलं कंकण, रंगली शुभ-अशुभची चर्चा

परंतु, आज नवी मुंबईतील सिडको कार्यालयाला घेराव घालण्यासाठी आंदोलकांनी विराट मोर्च्याचे नियोजन केले आहे. या आंदोलनात मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हे सुद्धा सहभागी होणार आहे. या आंदोलनात आपण का सहभागी होते, याबद्दल राजू पाटील यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून खुलासा केला आहे.

'राजसाहेब ठाकरे यांनी नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाबाबत वस्तुनिष्ठ तांत्रिक बाजू मांडली आहे. त्यानंतर अनेकजण विपर्यास करुन त्याचा वेगळा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला गेला, असा दावा पाटील यांनी केला.

'राहता राहिला प्रश्न 24 जूनच्या आंदोलनाचा. तर मी नम्रपणे आणि ठामपणे सांगू इच्छितो की हा मोर्चा आगरी, कोळी, कुणबी, कऱ्हाडी आणि शेकडो वर्षांचा इतिहास असलेल्या भूमीपुत्रांनी काढलेला मोर्चा आहे. राज्यभर जेव्हा मराठा आरक्षणासाठी लाखोंचे मूकमोर्चे निघत होते, तेव्हा जनभावना आणि सामाजिक जबाबदारी म्हणून आंदोलनात सहभागी झालो होतो. आताच्या घडीला तर माझा पूर्ण समाज या आंदोलनात उतरला आहे. त्यांच्या भावनेचा आणि विचारांचा कुटुंबातील एक सदस्य आणि लोकप्रतिनिधी म्हणून मला आदर आहे. कारण त्यांच्या  प्रेमामुळेच आपण इथवर पोहोचलो आहोत.  त्यामुळे राजकारणात असलो तरी लोकभावना आणि समाजकारण हेच माझं पहिलं प्राधान्य आहे.

म्हणूनच ज्यांनी माझ्या संपूर्ण समाजाला आणि भूमिपुत्रांना रस्त्यावर उतरण्यासाठी भाग पाडलंय, त्यांचा निषेध करण्यासाठी आणि भूमीपुत्रांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी या मोर्चात सहभागी होणार आहोत' असं राजू पाटील म्हणाले.

नवी मुंबई पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली

दरम्यान, आज आंदोलकांनी सिडको कार्यालयाला घेराव घालण्यासाठी आंदोलनाची तयारी केली आहे. नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली,  रायगड सोबतच ठाणे आणि पालघर मधून आंदोलन करण्यात येणार आहे.

रिक्षाचालक वडिलांच्या कष्टाळू मुलाची अवकाश झेप! वायुदलात Flying Officer

नवी मुंबई पोलिसांनी मात्र या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. कोरोना संसर्ग महामारीचे कारण पुढे करत पोलिसांनी आंदोलनाची परवानगी नाकारलीय असली तरी प्रकल्पग्रस्थानीं आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे. रायगड, ठाणे आणि पालघर मधून तब्बल 1 लाख आंदोलन कर्ते नवी मुंबईत येणार आहेत. या सर्व आंदोलन कर्त्यांना नवी मुंबईतील पामबीच मार्गावर अडवण्यात येणार आहे.

तिन्ही  जिल्ह्यातील गावागावांमधून हे आंदोलन पेटल्याने नवी मुंबईला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.  मुंबईकडून पुणे आणि कोकणाकडे जाणारी वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहे.

First published:

Tags: Raj Thackeray