मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

पुण्याच्या मेट्रोसाठी ठाकरे सरकार घेणार 1600 कोटींचं कर्ज

पुण्याच्या मेट्रोसाठी ठाकरे सरकार घेणार 1600 कोटींचं कर्ज

अत्यल्प व्याज दराने कर्ज उपलब्ध झाल्यामुळे राज्यातील इतरही मोठ्या प्रकल्पांसाठी युरोपियन बँक कर्ज उपलब्ध करण्यासाठी उत्सुक आहे.

अत्यल्प व्याज दराने कर्ज उपलब्ध झाल्यामुळे राज्यातील इतरही मोठ्या प्रकल्पांसाठी युरोपियन बँक कर्ज उपलब्ध करण्यासाठी उत्सुक आहे.

अत्यल्प व्याज दराने कर्ज उपलब्ध झाल्यामुळे राज्यातील इतरही मोठ्या प्रकल्पांसाठी युरोपियन बँक कर्ज उपलब्ध करण्यासाठी उत्सुक आहे.

  • Published by:  Ajay Kautikwar

मुंबई 31 जानेवारी : पुणे मेट्रो संदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी युरोपीयन इनव्हेस्टमेंट बँकेसोबत 1600 कोटी रुपयांच कर्ज घेण्याचा करार केलाय. मुंबईत MMRDA मुख्यालयात ही महत्वाची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि युरोपियन इनव्हेस्टमेंट बँकेचे प्रमुख एड्र्यू मॅकडॉवल उपस्थित होते. पुणे मेट्रो निर्धारीत कालावधीत पुर्ण करण्यासाठी कोणताही नीधी कमी पडू देणार नाही त्यासाठी हा महत्वपुर्ण आर्थिक करार केल्याचं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

अत्यल्प व्याज दराने कर्ज उपलब्ध झाल्यामुळे राज्यातील इतरही मोठ्या प्रकल्पांसाठी युरोपियन बँक कर्ज उपलब्ध करण्यासाठी उत्सुक असल्याचंही एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं.

पुणेकर अनेक वर्षांपासून प्रतीक्षा करत असलेल्या पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील संत तुकाराम नगर ते फुगेवाडी या पाच किमीच्या टप्प्याचे काम मार्च अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे.

एप्रिलपासून तो प्रवाशांच्या सेवेत खुला करण्याचे निर्देश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दिले. तसेच, वनाज-रामवाडी मार्गिकेतील आनंद नगर ते गरवारे हा पाच किमीचा टप्पा देखील जून अखेरपर्यंत पूर्ण करून जुलै महिन्यात प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

तुम्ही अ‍ॅक्सिडंटल मुख्यमंत्री आहेत का? उद्धव ठाकरेंनी दिलं हे बेधडक उत्तर

राज्याच्या विविध शहरांमध्ये महा मेट्रोच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या मेट्रो प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रालयात बैठक आयोजित केली होती. या बैठकीस नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश दीक्षित, संचालक सुब्रमण्यम रामनाथ, कार्यकारी संचालक एन. एम. सिंग आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

भाजपच्या जवळच्या लोकांनीच घडवला भीमा कोरेगावचा हिंसाचार - अनिल देशमुख

पुणे मेट्रोचे काम वेळापत्रकानुसार प्रगतीपथावर असून मार्च २०२२ पर्यंत संपूर्ण ३२.५० किमी मार्गावर, दोन्ही मार्गिकांवरील मेट्रो सुरू होईल, असे बैठकीत सांगण्यात आले. मेट्रोच्या कामाबाबत शिंदे यांनी समाधान व्यक्त करत, वेळापत्रकापूर्वी काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्याची सूचना केली.

First published: