मुंबई-पुणे एक्सप्रेसवर कारचा भीषण अपघात, 3 महिलांसह एकाचा मृत्यू

मुंबई-पुणे एक्सप्रेसवर कारचा भीषण अपघात, 3 महिलांसह एकाचा मृत्यू

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर खोपोली ब्रिजजवळ पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या ईरटीका कारची ट्रेलरला मागून जोरदार धडक बसली.

  • Share this:

खोपोली, 09 मार्च : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर झालेल्या भीषण अपघातामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये एक महिला गंभीर जखमी झाली होती. पण उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर खोपोली ब्रिजजवळ पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या ईरटीका कारची ट्रेलरला मागून जोरदार धडक बसली. या धडकेमध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 3 महिला तर एका पुरुषाचा समावेश आहे.

घटना घडताच काही वेळ रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होती.पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी रस्त्याच्या मधून गाडी बाजूला घेण्यात आली आहे. तर या अपघातामध्ये ईरटीका भूगा झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

दरम्यान, पोलीस सध्या या अपघाताचा आणखी तपास करत आहेत. प्रत्यक्षदर्शींचीही पोलीस चौकशी करत आहेत. तर अपघातात मृत झालेल्या घरच्यांना याची माहिती देण्यात आली आहे.

खरंतर, सध्या अपघात होण्याचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळे हायवेवर गाडी चालवताना सावकाश चालवा अशा वारंवार सुचना देण्यात येतात. पण तरीदेखील अपघात होण्याचं प्रमाण कमी होत नाही आहे.

 VIDEO : रेल्वे रुळावर काय करत होती ही महिला? समोरून आली फास्ट लोकल...

First published: March 9, 2019, 6:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading