B'day Special: लतादीदींनी 'या' कारणासाठी बहिणीसोबत तोडलं होतं नातं

लतादीदी आणि त्यांच्या बहिणीमध्ये अंतर निर्माण होण्याचं नेमकं काय कारण होतं?

लतादीदी आणि त्यांच्या बहिणीमध्ये अंतर निर्माण होण्याचं नेमकं काय कारण होतं?

  • Share this:
    मुंबई, 28 सप्टेंबर : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस. लतादीदी आज 91 वर्षांच्या झाल्या. लतादीदींचे चहाते भारतातच नाही तर जगभर आहेत. त्यांचा जन्म यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 ला मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये झाला. लता मंगेशकर यांनी 40 च्या दशकातच वयाच्या 14 व्या वर्षीच आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. वडील पंडित दीनानाथ मंगेशकर यांचा वारसा त्यांच्या सर्व मुलांनी चालवला. सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही लतादीदींची सख्खी भावंडं आहेत. आपल्या सुमधुर कोकिळेसारख्या आवाजामुळे लतादीदी जगविख्यात झाल्या त्यांनी मराठी, हिंदीसह विविध भाषांमध्ये लाखो गाणी गायली. हिंदी चित्रपटसृष्टीवर त्यांनी राज्य केलं. स्वातंत्र्यपूर्वकाळापासून गाणं म्हणणाऱ्या लतादीदींचे चहाते आजही पाकिस्तान आणि बांगलादेशात मोठ्या प्रमाणावर आहेत. लता आणि आशा या दोन बहिणींचे अनेक किस्से सांगितले जातात, मात्र आज आम्ही यातील एक खास किस्सा तुम्हाला सांगणार आहोत. वयाच्या 13 व्या वर्षी वडिलांच्या अकाली निधनामुळं लतादीदींच्या खांद्यांवर घराची सगळी जबाबदारी येऊन पडली. घरातील मोठी मुलगी असल्याने त्यांना जबाबदारी स्वीकाराली आणि त्याचं निर्वाहनही खंबीरपणे केलं. त्यांची लहान बहीण आशाही संगीत क्षेत्रात आली पण त्यांचा स्वभाव स्वतंत्र होता. आशा या वेगळ्या विचारांचा पुरस्कार करणाऱ्या होत्या. त्यांना कोणत्याही प्रकारचं बंधन नको होतं. हे वाचा-'म्हणून कुटुंबीयही लतादीदींना सतत भेटू शकत नाहीत',भाची राधा यांनी सांगितलं कारण लतादीदींचे सेक्रेटरी गणपतराव भोसले यांच्याशी आशाताईंनी वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी लग्न केलं. लग्नाच्या वेळी गणपतराव त्यावेळी 31 वर्षांचे होते. हे लतादीदींना अजिबात आवडलं नाही. आशा भोसले यांच्या या निर्णयामुळं लता खूप नाराज झाल्या होत्या. त्यांनी या लग्नाला मान्यता दिली नाही.या कारणामुळे लतादीदी आणि त्यांच्या बहिणीमध्ये काही वर्ष अबोला होता. त्यानंतर काही वर्षांनी पुन्हा एकदा लतादीदी आणि आशाताई एकमेकांसोबत बोलायला लागल्या. आशा भोसले यांनी भारतीय आणि जागतिक संगीत क्षितीजावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. हे वाचा-Lata Mangeshkar Birthday : लतादीदींबाबतचे किस्से! जे तुम्ही कधीही ऐकले नसतील लता मंगेशकरांनी संगीतक्षेत्रात एक अढळ असं स्थान निर्माण केलं आहे. कारकिर्दीत लतादीदींना आतापर्यंत अनेक महत्त्वाचे पुरस्कार मिळाले आहेत. भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने 2001 मध्ये त्यांचा गौरव करण्यात आला. कोणत्याही क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी भारतरत्न पुरस्कार भारत सरकारच्या वतीनं दिला जातो. बरोबरच त्यांना आतापर्यंत 3 नॅशनल अवार्ड, पद्मभूषण, दादासाहेब फाळके आणि पदमविभूषण हे पुरस्कार देऊनही गौरवण्यात आलं आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published: