राज्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या लाखवर गेली तर? सरकारने दिलं हे उत्तर!

राज्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या लाखवर गेली तर? सरकारने दिलं हे उत्तर!

मुंबईत टास्क फोर्सचे डॉक्टर मोठी कामगिरी करत आहेत. यातल्या 11 डॉक्टरांपैकी एक डॉक्टर नेहमी राज्यभरातील सर्व डॉक्टरांना मार्गदर्शन करण्यासाठी 24 तास उपलब्धं असतात.

  • Share this:

मुंबई 26 मे: महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने सर्व देशात चिंतेचं वातावरण आहे. त्यात मुंबईत परिस्थिती बिकट होत असल्याने राज्य सरकारचीही चिंता वाढली आहे. अशा परिस्थितीत मुख्य सचिव अजोय मेहता यांनी मंत्रालयात पत्रकार परिषद घेऊन राज्यातल्या परिस्थितीची माहिती दिली. परिस्थिती नियंत्रणात असून राज्य सरकार कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी सर्व प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं. डबलिंग रेट हा  तीन दिवसांवर होता तो आता 14 दिवस झाल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यात रुग्ण संख्या लाखावर गेली तरी आपल्याकडे ऑक्सिजनसह बेड उपलब्धं आहेत असंही त्यांनी सांगितलं.

मेहता म्हणाले, राज्यात ३५,१०७८ अक्टिव रुग्ण आहेत. १५, ७६८ रुग्ण बरे झाले आहेत. ७५ ते ८०% केसेसमध्ये लक्षणं दिसत नाहीत. आता आपण दिवसाला १३ हजार टेस्ट दररोज करतोय. पुढच्या १० दिवसांत ही टेस्टींगची संख्या आणखी वाढणार आहे.

२४ हजार केसेस मध्ये सध्या काहीच लक्षणं नाहीत. ४३२ ठिकाणी कोविड केअर सेंटर राज्यात निर्माण केलेत. राज्यात रुग्ण संख्या लाखावर गेली तरी आपल्याकडे ऑक्सिजनसह बेड उपलब्धं आहेत.

राष्ट्रपती राजवटीबाबत देवेंद्र फडणवीसांचा मोठा खुलासा, पवारांच्या टीकेलाही उत्तर

 आता डबलिंग रेट १४ दिवसांवर आलांय. हा आता हळू होत चालला आहे. आपल्याकडे हाच डबलिंग रेट ३ दिवसांवर होता आता तो १४ दिवसांवर आला आहे.

आधी आपल्याकडे २ टेस्टीग लॅब होत्या. एक केंद्र सरकारची आणि एक राज्य सरकारची होती. आणि आता आपल्याकडे ७२ लॅब मध्ये टेस्टींग होतंय. पुढे महिनाभरात हीच संख्या १०० लॅबवर जाणार आहे. सध्या दिवसाला १३ हजार टेस्ट होत आहेत. पुढच्या १० दिवसांत ही टेस्टींगची संख्या आणखी वाढणार आहे.

कोरोना रुग्णांच्या संख्येत धक्कादायक वाढ, मात्र या 2 गोष्टी भारतासाठी जमेच्या

 मुंबईत टास्क फोर्सचे डॉक्टर मोठी कामगिरी करत आहेत. यामध्ये ११ डाँक्टरांचा समावेश आहे. या ११ डॉक्टरांपैकी एक डॉक्टर नेहमी राज्यभरातील सर्व डॉक्टरांना मार्गदर्शन करण्यासाठी २४ तास उपलब्धं असतात. क्रिटीकल केसेस मध्ये राज्यभरातील डॉक्टर या तज्ञ डॉक्टरांची मदत घेत आहेत.

 

First published: May 26, 2020, 5:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading