मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /उड्डाण करताच हवेतच बंद पडलं इंजिन, Air India विमानाचं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

उड्डाण करताच हवेतच बंद पडलं इंजिन, Air India विमानाचं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

एअर इंडियाचे (Air India) A320neo विमान काही तांत्रिक बिघाडामुळे 27 मिनिटांनी मुंबई विमानतळावर परतले.

एअर इंडियाचे (Air India) A320neo विमान काही तांत्रिक बिघाडामुळे 27 मिनिटांनी मुंबई विमानतळावर परतले.

एअर इंडियाचे (Air India) A320neo विमान काही तांत्रिक बिघाडामुळे 27 मिनिटांनी मुंबई विमानतळावर परतले.

मुंबई, 20 मे: टाटा समूहाद्वारे (Tata Group) चालवलेले एअर इंडियाचे (Air India) A320neo विमान काही तांत्रिक बिघाडामुळे 27 मिनिटांनी मुंबई विमानतळावर परतले. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, विमान बदलल्यानंतर प्रवाशांना बेंगळुरू (Bangalore) येथे त्यांच्या गंतव्यस्थानी नेण्यात आलं.

रिपोर्टनुसार, एअर इंडियाचे हे विमान उड्डाण केल्यानंतर अवघ्या 27 मिनिटांत विमानतळावर परतले. एअर इंडियाच्या A320neo विमानाचे मुंबई विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. टाटा समूह संचालित विमान कंपनीचे हे विमान टेक ऑफ केल्यानंतर मुंबई विमानतळावर परतले, कारण त्यातील एक इंजिन तांत्रिक समस्येमुळे हवेत थांबले होते.

झोपेतच सून-मुलाची हत्या करणारा वृद्ध बाप बोलतो, ''साहेब, कारण विचारू नका...''

एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, बेंगळुरूला जाणाऱ्या या विमानातील प्रवाशांना गुरुवारी दुसऱ्या विमानात पाठवण्यात आलं आहे. हवाई वाहतूक नियामक महासंचालक नागरी विमान वाहतूक या घटनेची चौकशी करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. एअर इंडियाच्या A320neo विमानांमध्ये CFM लीप इंजिन बसवलेले आहेत.

या घटनेबाबत एअर इंडियाच्या प्रवक्त्याला विचारले असता ते म्हणाले की, एअर इंडिया सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देते, आमच्या विमानाचे वैमानिक आणि इतर कर्मचारी अशा आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे सक्षम आणि तज्ञ आहेत. या प्रकरणात आमच्या अभियांत्रिकी आणि देखभाल पथकांनी त्वरित या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

पुरामुळे 'या' राज्यात विध्वंस, 27 जिल्ह्यांमध्ये 7 लाखांहून अधिक लोक प्रभावित

A320neo विमानाने सकाळी 9.43 वाजता छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले. पण उड्डाणानंतर काही मिनिटांत विमानाच्या वैमानिकांना विमानाच्या एका इंजिनाबाबत उच्च एक्झॉस्ट तापमानाबाबत चेतावणी मिळाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंजिन बंद झाल्यानंतर पायलटने सकाळी 10.10 वाजता विमान पुन्हा मुंबई विमानतळावर उतरवले.

एअर इंडियाचं स्पष्टीकरण

या घटनेचे स्पष्टीकरण देताना एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, एअर इंडिया सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देते आणि आमचे क्रू या परिस्थिती हाताळण्यात पारंगत आहेत. आमच्या अभियांत्रिकी आणि देखभाल कार्यसंघांनी ताबडतोब या समस्येकडे लक्ष देणे सुरू केलं, ज्यामुळे आपत्कालीन लँडिंग झाले. प्रवक्त्याने सांगितले की, विमान बदलल्यानंतर प्रवाशांना बेंगळुरूला पाठवण्यात आले.

First published:

Tags: Air india, Airport