बाबा सिद्दीकी गोत्यात, ईडीचे कार्यालयांवर छापे

काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांच्या आणि त्यांच्या संबंधित बिल्डरवर आज ईडीनं छापे मारले आहेत. या छापेमारीमुळे सिद्दीकी चांगलेच अडचणीत आले आहेत.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 31, 2017 04:13 PM IST

बाबा सिद्दीकी गोत्यात, ईडीचे कार्यालयांवर छापे

विवेक कुलकर्णी, मुंबई

31 मे : काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांच्या आणि त्यांच्या संबंधित बिल्डरवर आज ईडीनं छापे मारले आहेत. या छापेमारीमुळे सिद्दीकी चांगलेच अडचणीत आले आहेत.

बाबा सिद्दीकी...राज्यातील माजी मंत्री इतकीच यांची ओळख नाही तर वांद्रे पश्चिमचे आमदार असल्यानं शाहरुख, सलमानचे दोस्त अशी त्यांची ओळख. शाहरुख आणि सलमानदरम्यान विस्तव जात नसताना सिद्दीकींच्या ईफ्तार पार्टीत बाॅलिवूडच्या या दोन सुपरस्टार्सनी गळाभेट घेतल्यानं सिद्दीकी यांना राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी मिळाली. हेच बाबा सिद्दीकी आज वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आले आहेत.

वांद्रे येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत घोटाळा केल्याचा आरोप सिद्दीकींवर आहे. याच प्रकरणाची सक्तवसुली  संचालनालयानं आज बाबा सिद्दीकी आणि त्यांचा सहकारी बिल्डर मकबूल कुरेशी यांच्या पाच कार्यालयांवर छापे मारले आहेत. यातून काही महत्त्वाची कागदपत्रं ईडीच्या हाती लागली असून त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळतेय.

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत एखाद्या भूखंडाचा विकास करायचा असेल, तर त्या भूखंडाचा काही भाग झोपडपट्टीधारकांसाठी सोडून द्यावा लागतो. मात्र, हे करताना सिद्दीकी व मकबूल कुरेशी यानं संगनमतानं बनावट कागदपत्रे बनविल्याचा व त्या माध्यमातून सुमारे १०० कोटींचा घोटाळा केला असा आरोप आहे. या प्रकल्पांमध्ये बोगस लाभधारक असल्याचा आरोप सिद्दीकींवर होतोय. मकबूल यांच्याकडून बाबा सिद्दीकी यांच्या कंपनीला पैसे गेल्याची कागदपत्रे ईडीला मिळाली आहेत अशी माहिती मिळतेय. या या सगळ्या प्रकरणामुळे बाबा चांगलेच अडचणीत आले आहेत.

Loading...

जसजशी या छाप्यातील कागदपत्रांतील माहिती समोर येईल तसतसे सिद्दीकी जास्त गोत्यात येतील अशी सध्या चर्चा सुरू झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 31, 2017 04:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...