दिवाळखोरीत गेलेल्या 'जेट'च्या नरेश गोयल यांच्या घर-ऑफिसवर EDचे छापे

नरेश गोयल यांच्यावर 18 हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचे आरोप आहेत. गोयल यांच्याविरुद्ध लुक आऊट नोटीसही जारी करण्यात आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 23, 2019 03:41 PM IST

दिवाळखोरीत गेलेल्या 'जेट'च्या नरेश गोयल यांच्या घर-ऑफिसवर EDचे छापे

मुंबई 23 ऑगस्ट : दिवाळखोरीत गेलेल्या जेट एअरवेजचे मालक नरेश गोयल यांच्या ऑफिस आणि घरावर EDने आज छापे टाकेल. दिल्ली आणि मुंबईत छापे घालण्यात आले असून 12 पेक्षा जास्त ठिकाणी सर्च मोहिम सुरू आहे. यात नरेश गोयल यांच्या मुंबईतल्या निवासस्थानीही छापे घालण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वीच गोयल यांना विदेशात जाण्यापासून रोखण्यात आलं होतं. हवाई वाहतूक क्षेत्रात कधी काळी दिग्गज मानली जाणारी  'जेट' ही कंपनी दिवाळखोरीत निघाली असून सध्या बंद आहे. त्यामुळे शकडो जणांना आपली नोकरी गमवावी लागलीय.

नरेश गोयल यांच्यावर 18 हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचे आरोप आहेत. गोयल यांच्याविरुद्ध लुक आऊट नोटीसही जारी करण्यात आली आहे. ती नोटीस रद्द करावी यासाठी गोयल यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र विदेशात जायचं असेल तर तुम्हाला 18 हजार कोटींची गॅरंटी द्यावी लागेल असं कोर्टाने त्यांना बजावलं होतं. त्यामुळे ही याचिका वापस घेण्यासाठी गोयल यांनी कोर्टात अर्ज केलाय.

मनसे Vs भाजप संघर्ष पेटणार, मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न

आर्थिक संकटामुळे बंद पडलेल्या जेट एअरवेजचे चेअरमन नरेश गोयल आणि त्यांच्या पत्नी अनिता गोयल यांना इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी परदेशात जाण्यापासून रोखलं. हे दोघंजण मुंबई एअरपोर्टवर आले तेव्हा त्यांच्यावर ही कारवाई झाली.

गोयल दाम्पत्याला विमानतळावर रोखलं

Loading...

मे महिन्यात नरेश गोयल आणि त्यांची पत्नी दुबईकडे निघालेल्या इमिरेट्स EK 507 या विमानाने प्रवास करणार होते. पण त्यांना प्रवास करण्याची परवानगी नाकारण्यात आली होती.

विमानातून सामानही उतरवलं

त्यांचं चेक इन केलेलं सामानही विमानातून उतरवण्यात आलं होतं. त्यांचं हे विमान मुंबईहून साडेतीन वाजताच्या सुमाराला टेक ऑफ घेणार होतं मात्र त्याआधीच ही कारवाई करण्यात आली होती.

'फक्त शतक करण्यासाठी खेळायला मी स्वार्थी नाही', उत्तराची चर्चा

आर्थिक संकटामुळे बंद कराव्या लागलेल्या जेट एअरवेजची इडीकडून चौकशी सुरू आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडेही त्यांच्या चौकशीची सूत्रं देण्यात आली आहेत. जेटचे संस्थापक नरेश गोयल यांची इतर परदेशी एअरलाइन कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे का याचीही इडी चौकशी करत आहे.

कर्जबाजारी जेट एअरवेज

जेट एअरवेजवर 6 हजार 398 कोटींचं कर्ज आहे. या सगळ्या स्थितीमुळे नरेश गोयल आणि अनिता गोयल यांनी जेट एअरवेजच्या व्यवस्थापक मंडळाचा राजीनामा दिला. नरेश गोयल यांनी 26 वर्षांपूर्वी जेट एअरवेजची स्थापना केली होती. पण आता त्यांनी या एअरलाइनच्या चेअरमनपदाचाही राजीनामा दिला आहे.

बॉलीवूड अभिनेता परेश रावल यांच्या ड्रायव्हरवर बलात्काराचा आरोप

कर्मचाऱ्यांचे पगार थकले

ज्या कंपनीच्या एअरलाइनने हजारो प्रवासी टेक ऑफ घ्यायचे त्याच एअरलाइनच्या कंपनीच्या मालकांवर परदेश प्रवास रोखण्याची कारवाई होणं हे दुर्दैवी आहे, असं बोललं जात आहे. जेट एअरवेज कर्जाच्या खाईत असल्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार थकले आहेत. अशा स्थितीत नरेश गोयल हे मात्र परदेशात जाणार होते. मात्र त्यांना प्रवासाची परवानगी नाकारण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: ED
First Published: Aug 23, 2019 03:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...