तसंच, 'वीज पुरवठा अर्ध्या तासात सुरू होऊन जाईल, असं आश्वासनही नितीन राऊत यांनी दिले. दरम्यान, मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या बेस्ट इलेक्ट्रीकने ट्वीट करून माहिती दिली आहे. 'टाटा इलेक्ट्रिककडून येणाऱ्या विद्युत पुरवठ्यात बिघाड झाल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.' अशी माहिती बेस्टने दिली आहे. तसंच, झालेल्या गैरसोयीबद्दल बेस्टने दिलगिरी व्यक्त केली आहे. लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या थांबल्या वीज पुरवठा ठप्प झाल्यामुळे लोकल सेवेवरही परिणाम झाला आहे. मुंबईतील लोकल ठप्प झाल्या आहे. सर्व स्थानकांवर लोकल थांबलेल्या आहे. मध्य रेल्वेवर लोकल गाड्या जागच्या जागी थांबल्या आहे. कुर्ला, दादर, डोंबिवली, कळवा स्थानकावर लोकल थांबल्या आहे. गेल्या अर्ध्या तासापासून प्रवासी लोकलमध्ये खोळंबले आहे. वीज पुरवठा ठप्प झाल्यामुळे लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर झाला आहे. मुंबईकडे येणाऱ्या आणि मुंबईतून जाणाऱ्या गाड्या स्थानकांवर थांबलेल्या आहे. कल्याणमध्ये वीज पुरवठा ठप्प ग्रीड फेल्युअरमुळे कल्याण भागाला टाटा पॉवरकडून वीजपुरवठा होणारे केबी-1 व केबी-2 हे दोन फिडर बंद आहेत. केबी-2 फिडरवरून कल्याण पश्चिमेला वीजपुरवठा होतो. कल्याण पश्चिमेतील वायलेनगर, पारनाका, दुर्गाडी, गांधारी रोड, आधारवाडी परिसरातील जवळपास 50 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला आहे. तर केबी-1 फिडरवरून वीजपुरवठा होणाऱ्या कल्याण पूर्वेतील 90 फूट रोड, टाटा नेतीवली परिसरातील सुमारे 10 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला आहे. या फिडरवरील वीज ग्राहकांना पर्यायी फिडरमार्फत वीजपुरवठा सुरू करण्यात येत आहे. आतापर्यंत 16 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा पर्यायी मार्गाने सुरू करण्यात आला आहे. वरील फिडर वगळता इतर सर्व ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत आहे.मुंबईत वीज पुरवठा ठप्प झाला, ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची प्रतिक्रिया #powercut pic.twitter.com/NDzMghfbeS
— News18Lokmat (@News18lokmat) October 12, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.