मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

वीज बिलात सवलत मिळणार का? नितीन राऊतांनी चर्चेला दिला अखेर पूर्णविराम

वीज बिलात सवलत मिळणार का? नितीन राऊतांनी चर्चेला दिला अखेर पूर्णविराम

'राज्यात बिल सवलत देण्यासाठी केंद्र सरकारने मदत करावी अशी मागणी केली आहे, पण केंद्र सरकारने मदत केली नाही'

'राज्यात बिल सवलत देण्यासाठी केंद्र सरकारने मदत करावी अशी मागणी केली आहे, पण केंद्र सरकारने मदत केली नाही'

'राज्यात बिल सवलत देण्यासाठी केंद्र सरकारने मदत करावी अशी मागणी केली आहे, पण केंद्र सरकारने मदत केली नाही'

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 16 नोव्हेंबर : 'वीज वापरली तितकेच बिल (electricity bill)आले पाहिजे, कोणाचे वीज कनेक्शन कट होणार नाही. पण लोकांनी त्याचे बिल भरावे', असं म्हणत ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin raut) यांनी लॉकडाउनच्या (Lockdown) काळात आलेल्या भरमसाठ वीज बिलात सवलत देण्यास नकार दिला आहे.

लॉकडाउनच्या काळात एकत्र आलेल्या भरमसाठ वीज बिलांमुळे एकच गोंधळ उडाला होता. भाजपने राज्यभर आंदोलन केले होते. राज्य सरकारने वीज बिलात सवलत देण्यासाठी हालचाल सुरू केली होती. पण, आता सर्व शक्यता ही मावळली आहे.

बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी संजय राऊतांनी भाजप नेत्यांना फटकारले, म्हणाले...

'राज्यात बिल सवलत देण्यासाठी केंद्र सरकारने मदत करावी अशी मागणी केली आहे, पण केंद्र सरकारने मदत केली नाही. वीजबिल सवलत तुर्तास मिळेल असे वाटत नाही. महावितरण 24 तास वीज उपलब्ध केली आहे. त्यामुळे लोकांनी वीज वापरली त्याचे बिल भरावी, असं नितीन राऊत यांनी स्पष्ट केले.

'वीज वापरली तितकेच बिल आले पाहिजे, कोणाचे वीज कनेक्शन कट होणार नाही. योग्य बिल नसले तर त्याची तक्रार करावी, मीटर पाहणी केली जाईल' असंही राऊत म्हणाले.

 वीज बिल वसुलीसंदर्भात परिपत्रक जारी

दरम्यान, 15 नोव्हेंबर रोजी महावितरणने वीज बिल वसुलीसंदर्भात परिपत्रक जारी केलं आहे. त्यामुळे वीज बिल वसुली करण्याचे निर्देश महावितरणने दिले आहेत, हे स्पष्ट आहे. यासाठी मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. महावितरणने दिलेली बिलं कशी योग्य आहेत हे ग्राहकांना समजावून सांगावे, असंही कर्मचाऱ्यांना सांगण्यात आलं आहे.

भारताविरुद्ध शूज न घालता मैदानात उतरणार ऑस्ट्रेलियाचा संघ, कारण वाचून कराल सलाम

प्रत्येक ठिकाणी जाऊन मीटर रीडिंग, वीज बिल छपाई आणि वीज बिल वाटप सुरू होणार आहे. वीज बिल वसुलीसाठी मेळावे घ्यावे, वीज ग्राहकांना टप्या-टप्याने वीज बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, थकबाकी वसुलीसाठी जनजागृती करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. वीज बिल वसुलीचे प्रमाण असमाधानकारक असल्याचंही महावितरणचं म्हणणं आहे.

First published:

Tags: महावितरण