Home /News /mumbai /

सचिन वाझेनं मनसुख हिरेनच्या हत्येची जबाबदारी सोपवली होती प्रदीप शर्मावर, NIA च्या आरोपपत्रात खुलासा

सचिन वाझेनं मनसुख हिरेनच्या हत्येची जबाबदारी सोपवली होती प्रदीप शर्मावर, NIA च्या आरोपपत्रात खुलासा

मनसुख हिरेनच्या (Mansukh Hiren Murder Case) हत्येप्रकरणी एक नवा खुलासा झाला आहे.

    मुंबई, 08 सप्टेंबर: मनसुख हिरेनच्या (Mansukh Hiren Murder Case) हत्येप्रकरणी एक नवा खुलासा झाला आहे. या प्रकरणीराष्ट्रीय तपास यंत्रणेनं (NIA) आरोपपत्र दाखल केलं आहे. या आरोपपत्रात एनआयएनं असं म्हटलं आहे की, एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांना मनसुख हिरेन यांना मारण्याचं काम सोपवण्यात आलं होतं. यासाठी शर्मा यांना सचिन वाझे (Sachin Waze) यांच्या कडून 'मोठी रक्कम' देण्यात आली होती. बिझनेसमन मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटके ठेवल्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि बडतर्फ सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं. त्यानंतर याप्रकरणा संदर्भातली ही माहिती समोर येत आहे. आरोपपत्रातून मनसुख हिरेनला संपवण्याचा कट रचल्याचा खुलासा झाला आहे. प्रदीप शर्मा यांनी संतोष शेलार यांच्यामार्फत ही घटना घडवून आणली होती. गणेशोत्सवादरम्यान तस्करांचा मोठा डाव; सिंधुदुर्गात आढळल्या लाखोंच्या बनावट नोटा  हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार आरोपपत्रात असं म्हटलं आहे की, हे काम प्रदीप शर्मा (A-10)ला देण्यात आलं होतं. मनसुख हिरेनची हत्या करण्याचं काम हाती घेतल्यानंतर या षडयंत्रात आरोपी प्रदीप शर्मानं आरोपी संतोष शेलार (A-6) शी संपर्क साधला आणि पैशासाठी हत्या करु शकतो का? असं विचारलं होतं. आरोपपत्रानुसार, आरोपी शेलार यांनी यासाठी आपला होकार दिला होता. हिरेनच्या हत्येपूर्वी 2 मार्चला वाझेनं हिरेनसोबत मीटिंग केली होती. यादरम्यान त्याच्यासोबत अन्य दोन पोलीस सुनील माने आणि प्रदीप शर्मा उपस्थित होते. पुढे आरोपपत्रात म्हटलं आहे की, हिरेन याला ओळखता यावं म्हणून वाझेनं या दोघांनाही सोबत नेलं होतं. दक्षिण मुंबईत स्फोटकांनी भरलेली गाडी (महिंद्रा स्कॉर्पियो) सापडल्यानंतर एका आठवड्यानंतर ही बैठक झाली होती. Aruna Bhatia Death:  निर्मित्या होत्या अरुणा भाटिया, अक्षयसह या सिनेमांची केली होती निर्माती आरोपपत्रात म्हटलं आहे की, रक्कम मिळाल्यानंतर शर्मानं शेलारला फोन केला आणि लाल टवेरा वाहनाचा तपशील मिळवला. याच वाहनाचा वापर हिरेनची हत्या आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी केला जाणार होता. वाजे आणि माने यांच्यात ठरल्याप्रमाणे 4 मार्च रोजी मानेनं क्रिकेट सट्टेबाज नरेश गोटकडून मिळालेल्या बनावट सिमद्वारे हिरेनला मालाडमधील पोलीस म्हणून कॉल केला होता. वाझेनं सुरुवातीलाच हिरेनची अटक आणि विशेषत: महाराष्ट्र एटीएसच्या चौकशीपासून वाचवण्यासाठी सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितलं होतं. यावर हिरेन यावर तयार झाला आणि ठाण्यातील घोडबंदर रोडवरील सुरज वॉटर पार्कजवळ पोलीस अधिकाऱ्याला भेटला. मानेनं हिरेनला सोबत घेतलं आणि शेलारपर्यंत पोहोचवलं. शेलार आधीपासून टवेरामध्ये मनीष सोनी, सतीश मोतुकारी आणि आनंद जाधव आधीपासूनच वाट पाहत होता. यानंतर चौघांनी कारमध्ये हिरेनची हत्या केली आणि मृतदेह नाल्यात फेकून दिला. एनआयएने दोन्ही प्रकरणांचा तपास हाती घेतला आणि खुलासा केला की, हे सर्व वाझेचं काम असल्याचं उघड केलं.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Hiren mansukh, Mumbai case

    पुढील बातम्या