एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा पुन्हा सेवेत दाखल होणार ?

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा पुन्हा सेवेत दाखल होणार ?

. शर्मा यांच्या नावावर एकूण 100 पेक्षा जास्त एन्काऊंटरची नोंद आहे.

  • Share this:

14 आॅगस्ट : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांची लवकरच 'घरवापसी' होण्याची शक्यता आहे.

1983 बॅचचे पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांची कारकिर्द वादातीत राहिली. शर्मा यांच्या नावावर एकूण 100 पेक्षा जास्त एन्काऊंटरची नोंद आहे. त्यांच्या धडाकेबाज कामगिरीवर "अब तक 56" चित्रपट साकारला होता.

प्रदीप शर्मा यांना 2006 मध्ये लखन भय्या फेक एन्काऊंटर प्रकरणी अटक करण्यात आली होती. या प्रकरणी सत्र न्यायालयाकडून त्यांना लगेच जामीनही मिळाला होता. पण, याच प्रकरणात सिनिअर पीआय प्रदीप सुर्यवंशीसह 13 पोलीस आणि इतर 8 जण दोषी आढळल्यामुळे प्रदीप शर्मा यांनी सेवेतून बडतर्फ करण्यात आलं होतं. न्यायालयातून मुक्तता झाल्यानंतर बडतर्फ निर्णयाला प्रदीप शर्मा यांनी आव्हान दिलं होतं आणि त्याचा निर्णय त्यांच्याच बाजूने लागला.

90 च्या दशकात मुंबईमध्ये जेव्हा अंडरवर्ल्डने हातपाय पसरवले होते. तेव्हा पोलिसांनी अंडरवर्ल्ड राज संपवण्यासाठी एन्काऊंटर मोहीम हाती घेतली होती. मात्र, यानंतर एनकाऊंटरमध्ये सहभागी असलेले पोलीस अधिकारी वेगवेगळ्या गँगकडून सुपारी घेत असल्याचा आरोप होऊ लागला. 2006 मध्ये लखन भय्या एन्काऊंटर प्रकरण सुद्धा सुपारी किलिंग म्हणून झालं असा संशय निर्माण झाला होता.

First published: August 14, 2017, 10:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading