मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Daya Nayak: एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची तडकाफडकी बदली, चर्चांना उधाण

Daya Nayak: एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची तडकाफडकी बदली, चर्चांना उधाण

Daya Nayak transtered: एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेल्या दया नायक यांची मुंबईतून तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

Daya Nayak transtered: एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेल्या दया नायक यांची मुंबईतून तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

Daya Nayak transtered: एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेल्या दया नायक यांची मुंबईतून तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

मुंबई, 6 मे: एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलीस निरीक्षक दया नायक (Encounter Specialist Daya Nayak) यांची आज तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. या संदर्भातील आदेशही काढण्यात आले आहेत. मुंबई बाहेर त्यांची बदली करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक दयानंद नायक यांची दहशतवाद विरोधी पथक, मुंबई येथून गोंदिया (Gondia) येथे बदली करण्यात आली आहे. राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक कुलवंत सारंगल यांनी या संदर्भातील आदेश काढले आहेत. मुंबई पोलीस दलातील सचिन वझे याला अटक करण्यात आल्यानंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आणि मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यातच आता दया नायक यांचीही बदली करण्यात आली आहे. गोंदिया जिल्हा जात प्रमाणपत्र समिती येथे दया नायक यांची बदली करण्यात आली आहे. वाचा: घटनास्थळी आढळल्या 21 फिंगर प्रिंट, कॉम्प्युटरच्या मॉनिटरमुळे लागला खून प्रकरणातील आरोपीचा शोध मुंबईत आढळून आलेले स्फोटक प्रकरण आणि त्यानंतर झालेली मनसूख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास ज्या एटीएस टीम्स करत होत्या त्यापैकी जुहू एटीएसच्या टीमचे नेत्रृत्व हे दया नायक करत होते. दया नायक यांच्या या तडकाफडकी बदलीने अनेक चर्चा रंगण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान अप्पर पोलीस महासंचालक (आस्थापना) कुलवंत सारंगल यांनी काढलेल्या पत्रकात म्हटलं आहे की, ही बदली प्रशासकीय कारणास्तव करण्यात येत आहे. या पत्रात म्हटलं, महाराष्ट्र पोलीस कायदा 1951, कलम 22 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन पोलीस आस्थापना मंडळ क्र. 2 यांनी मान्यता दिल्याप्रमाणे पोलीस निरीक्षक दयानंद नायक यांची दहशतवाद विरोधी पथक मुंबई ते जि. जा. प्र. त. स. गोंदिया येथे प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात येत आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Maharashtra, Mumbai police

पुढील बातम्या