इन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना मोठा दिलासा; बदलीला मॅटकडून स्थगिती

इन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना मोठा दिलासा; बदलीला मॅटकडून स्थगिती

एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलीस निरीक्षक दया नायक यांची गोंदियाला तडकाफडकी बदली करण्याचे आदेश जारी करण्यात आले होते.

  • Share this:

मुंबई, 12 मे: एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक (Encounter Specialist Daya Nayak) यांच्या बदलीला मॅट (MAT)ने स्थगिती दिल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दया नायक यांची मुंबईतून करण्यात आलेल्या बदलीला मॅटने स्थगिती दिली आहे. त्यामुळे दया नायक हे आपल्या मुंबई (Mumbai)तील पदावर कायम राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.

एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलीस निरीक्षक दया नायक यांची गोंदियाला (Gondia) तडकाफडकी बदली करण्याचे आदेश जारी करण्यात आले होते. 6 मे रोजी जारी करण्यात आलेल्या या आदेशानुसार गोंदियातील जात प्रमाणपत्र पडताळणी उपसमितीच्या कार्यालयात दया नायक यांची बदली करण्यात आली होती. मात्र, आता मॅटने या बदलीला स्थगिती दिल्याची माहिती समोर आली आहे.

वाचा: Daya Nayak: एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची तडकाफडकी बदली, चर्चांना उधाण

मुंबई पोलीस दलातील सचिन वाझे याला अटक करण्यात आल्यानंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती. तसेच यानंतर पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्याही करण्यात आल्या आहेत. त्यातच दया नायक यांचीही तडकाफडकी बदली करण्यात आल्याचे आदेश काढण्यात आले. या तडकाफडकी बदलीने चर्चांना उधाण आले होते.

मुंबईत एका एसयूव्ही गाडीत स्फोटक आढळून आली होत. ज्या गाडीत ही स्फोटके आढळून आली होती त्या गाडीचा मालक असलेल्या मनसूख हिरेन याचाही नंतर संशयास्पद मृत्यू झाला. या दोन्ही प्रकरणात मुंबई पोलीस दलातील सचिन वाझे याला अटक करण्यात आली. मनसूख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास ज्या एटीएस टीम्स करत होत्या त्यापैकी जुहू एटीएस टीमचे नेत्रृत्व हे दया नायक करत होते.

Published by: Sunil Desale
First published: May 12, 2021, 5:46 PM IST

ताज्या बातम्या