एल्फिन्स्टन-परळ जोडपुलाचं मंगळवारी उद्घाटन

एल्फिन्स्टन-परळ जोडपुलाचं मंगळवारी उद्घाटन

लष्कराने उभारलेल्या एल्फिन्स्टन-परळ जोडपूल, करी रोड आणि आंबिवलीतील पादचारी पुलांचे उद्घाटन मंगळवार करण्यात येणार आहे.

  • Share this:

23 फेब्रुवारी : लष्कराने उभारलेल्या एल्फिन्स्टन-परळ जोडपूल, करी रोड आणि आंबिवलीतील पादचारी पुलांचे उद्घाटन मंगळवार करण्यात येणार आहे. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन, रेल्वेमंत्री पियुष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या उपस्थितीत पुलांचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. त्याचवेळी पश्चिम रेल्वेवरील अंधेरी ते गोरेगाव हार्बर लोकल सेवेच्या विस्तारासही हिरवा कंदील दाखवण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वेवर एल्फिन्स्टन स्थानकावरील पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत २३ प्रवाशांचा हकनाक मृत्यू ओढवला. त्यानंतर डोळे उघडलेल्या रेल्वे प्रशासनाने एल्फिन्स्टन-परळ जोडपूल, करी रोड आणि आंबिवलीतील पादचारी पूल उभारण्यासाठी थेट लष्करास साकडे घातले. रेल्वे मंत्रालयाची गरज लक्षात घेत लष्कराने जलदगतीने पूल उभारणीचे काम हाती घेतले.

३१ जानेवारीपर्यंत तिन्ही पूल तयार होतील, असा दावा करण्यात आला होता. पण, त्यात तांत्रिक अडचणी येत गेल्याने पुलांच्या पूर्ततेस थोडा कालावधी लागला. एल्फिन्स्टन पुलाच्या दुर्घटनेनंतर संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी घटनास्थळाची पाहणी केली होती. या पुलांच्या उद्घाटनासाठी तिघेही उपस्थित राहणार आहेत.

First published: February 23, 2018, 12:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading