मुंबई मनपामध्ये महाभरती, चतुर्थ श्रेणीतली 1,388 रिक्त पदं भरणार

मुंबई मनपामध्ये महाभरती, चतुर्थ श्रेणीतली 1,388 रिक्त पदं भरणार

पालिकेचे जलविभाग, आरोग्य खाते, रुग्णालये, मलनि:सारण या अत्यावश्यक विभागांमध्ये कामगारांची पदे काही वर्षांपासून रिक्त आहेत. या विभागात कामगार, कक्षपरिचर, हमाल, आया, स्मशान कामगार प्रवर्गांतील १,३८८ रिक्त पदे सरळ सेवेने भरली जाणार आहे.

  • Share this:

14 नोव्हेंबर : मुंबई महापालिकेत तब्बल आठ वर्षांनी चतुर्थ श्रेणी कामगारांची महाभरती होणार आहे. पालिकेच्या विविध विभागांतील कामगारांची रिक्त होणारी पदे भरण्यासाठी तब्बल १,३८८ जागांसाठी भरती होणार आहे. संपूर्ण ऑनलाइन पद्धतीने ही भरती होणार आहे .

पालिकेचे जलविभाग, आरोग्य खाते, रुग्णालये, मलनि:सारण या अत्यावश्यक विभागांमध्ये कामगारांची पदे काही वर्षांपासून रिक्त आहेत. या विभागात कामगार, कक्षपरिचर, हमाल, आया, स्मशान कामगार प्रवर्गांतील १,३८८ रिक्त पदे सरळ सेवेने भरली जाणार आहे.

पालिकेत यापूर्वी सन २००९मध्ये शेवटची कामगारांची पदे भरली गेली होती.

1,388 कर्मचाऱ्यांची भरती

- सर्व पदं चतुर्थ श्रेणीत

- संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन

- जल, आरोग्य, रुग्णालयं, मलनिःसारण विभागांमध्ये भरती

- कामगार, कक्षपरिचर, हमाल, आया, स्मशान कामगार

- याआधी भरती कधी ? - 2009

First published: November 14, 2017, 9:39 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading