मुंबईतले नोकरदार सर्वात जास्त तास करतात काम, इतर देशांचा कितवा आहे नंबर?

मुंबईतले नोकरदार सर्वात जास्त तास करतात काम, इतर देशांचा कितवा आहे नंबर?

UBSच्या अहवालाप्रमाणे त्यांनी जगभरातल्या 77 शहरांचं सर्वेक्षण केलं. त्यात व्यक्ती सरासरी किती तास काम करतात हे तपासलं.

  • Share this:

मुंबई, 04 एप्रिल : स्विस इनव्हेस्टमेंट बँक USBनं केलेल्या रिसर्चमध्ये हे समोर आलंय की मुंबईत नोकरी करणारा नोकरदार जगभराच्या तुलनेत सर्वात जास्त काम करतो. तो वर्षाला एकूऩ 3,315 तास काम करतो.

UBSच्या अहवालाप्रमाणे त्यांनी जगभरातल्या 77 शहरांचं सर्वेक्षण केलं. त्यात व्यक्ती सरासरी किती तास काम करतात हे तपासलं.

या अहवालाप्रमाणे मुंबईतले नोकरदार सर्वात जास्त तास काम करतात. त्याखालोखाल हानोई, मेक्सिको सिटी आणि नवी दिल्ली यांचा नंबर लागतो. इथले कर्मचारी जास्त तास काम करतात. उलट लागोस, रोम आणि काॅपनहेगन इथले कर्मचारी सर्वात कमी तास काम करतात.

मुंबईतले नोकरदार सुट्ट्याही कमी घेतात. ते वर्षाला फक्त 10 सुट्ट्या घेतात. तर रियाधमध्ये नोकरदार सर्वात जास्त सुट्ट्या घेतात. ते वर्षाला 37 सुट्ट्या घेतात.

या अहवालात असं म्हटलंय की मुंबईतले नोकरदार iPhone X परवडावा म्हणून 900 तास काम करतात. कैरोनंतर हा नंबर लागतो.

आॅर्गनायझेशन फाॅर इकाॅनाॅमिक काॅर्पोरेशन अँड डेव्हलपमेंट ( OECD )नं तुर्कीमध्ये आठवड्यात कर्मचारी 60 तास काम करतात किंवा त्याहून जास्तही.

नाॅर्डिक देशांमध्ये कामाचा आणि आयुष्याचा तोल योग्य पद्धतीनं राखला जातो. त्यालाच वर्क लाइफ बॅलन्स म्हणतात. नेदरलँडमध्ये फक्त 0.5 टक्के नोकरदार आठवड्याला 50 तासांपेक्षा जास्त काम करतात.

दरम्यान, अत्यंत वाईट वर्क-लाइफ बॅलन्स आहे तुर्कीमध्ये. त्याखालोखाल नंबर लागतो मेक्सिको आणि इस्रायलचा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: mumbaiwork
First Published: Apr 4, 2019 04:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading