मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

वा रे वा! ऑफिसमधून सुट्टी मिळवण्यासाठी पठ्ठ्याने बॉसलाच गंडवलं; प्रवाशांनीही केली मदत

वा रे वा! ऑफिसमधून सुट्टी मिळवण्यासाठी पठ्ठ्याने बॉसलाच गंडवलं; प्रवाशांनीही केली मदत

या पठ्ठ्याने सॉलिड जुगाड करीत शेवटी सुट्टी मिळवलीच...

या पठ्ठ्याने सॉलिड जुगाड करीत शेवटी सुट्टी मिळवलीच...

या पठ्ठ्याने सॉलिड जुगाड करीत शेवटी सुट्टी मिळवलीच...

  • Published by:  Meenal Gangurde
मुंबई, 9 जुलै : सध्या मुंबईत पावसाची (Mumbai Local Train) तुफान फटकेबाजी सुरू आहे. तुफान पावसात मुंबईकरांसमोर (Mumbai News) एक मोठं आव्हान उभं ठाकतं ते म्हणजे लोकलमधून प्रवास करण्याचं. अनेकदा रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे प्रवास करणं कठीण होतं. याचा सर्वाधिक परिणाम नोकरदार वर्गाला सहन करावा लागतो. गेली अनेक वर्षे हेच चित्र आहे. आता तर मुंबईकरांनाही याची सवय झाली आहे, असं म्हणायला हरकत नाही. विशेष म्हणजे ज्या दिवशी रेल्वे ट्रॅकवर पाणी जमा होतं, त्यामुळे लोकल बंद असते. आणि परिणामी कर्मचाऱ्यांना सुट्टीचा आनंद घ्यायला मिळतो. त्यामुळे अनेकदा कर्मचारीही पावसाळा आली की, मनोमन लोकल बंद होण्याची प्रार्थनाही करीत असतात. मात्र जर लोकल बंदच झाली नाही तर? एका मुंबईकराने यावर एक जुगाड शोधून काढला आहे. विशेष म्हणजे इतरांनी त्याला यात मदतही केली आहे. ब्रायन मिरांडा नावाच्या व्यक्तीने, ट्रेन सेवा विस्कळीत झाल्याचे आपल्या बॉसला पटवून देण्यासाठी लोकल ट्रेन प्रवाशांकडून मदत मागितली. त्या दिवशी ऑफिसमधून सुट्टी मिळावी म्हणून त्याने हे केले. यासाठी त्याने एम इंडिकेटरची मदत घेतली. एम इंडिकेटरच्या अॅपमध्ये चॅटरूमची सोय आहे. येथे प्रवाशी लोकलची सद्यस्थिती सांगून इतर प्रवाशांना अलर्ट करू शकतात. चॅटच्या स्क्रीनशॉटमध्ये पाहू शकता की, मिरांडा इतर प्रवाशांना गोरेगाव नंतर गाड्या काम करत नाही आहेत, असे उत्तर देण्यास सांगत आहे. “गोरेगाव नंतर गाड्या चालतात का?” त्याने विचारले. लवकरच, अनेक वापरकर्त्यांनी खोटे बोलून “नाही” असे उत्तर दिले. काही क्षणांनंतर, हा पठ्ठ्या सर्वांचे आभार मानण्यासाठी आणि त्याची आठवड्याची सुट्टी मंजूर झाल्याची घोषणा करण्यासाठी चॅटरूममध्ये परत आला.
First published:

Tags: Mumbai, Mumbai local, Rain updates

पुढील बातम्या