Home /News /mumbai /

ठाकरे कुटुंबातला भावुक क्षण, मुलाला पाहण्यासाठी राज ठाकरे पोहोचले लीलावती हॉस्पिटलमध्ये, VIDEO

ठाकरे कुटुंबातला भावुक क्षण, मुलाला पाहण्यासाठी राज ठाकरे पोहोचले लीलावती हॉस्पिटलमध्ये, VIDEO

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि नेते अमित ठाकरे यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये रविवारी रात्री दाखल करण्यात आले आहे.

    मुंबई, 19 ऑक्टोबर : मनसेचे नेते अमित ठाकरे यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मुलाला दाखल करण्यात आल्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे लीलावती हॉस्पिटलमध्ये पोहोचले आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि नेते अमित ठाकरे यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये रविवारी रात्री दाखल करण्यात आले आहे. अमित ठाकरे यांना गेल्या दोन दिवसांपासून ताप आला होता, तसंच प्रकृतीही ठीक नव्हती. त्यामुळे अखेर खबरदारी म्हणून लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. आज दुपारी 12.15 च्या सुमारास राज ठाकरे आपल्या पदाधिकाऱ्यांसह लीलावती हॉस्पिटलमध्ये पोहोचले आहे. लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर अमित ठाकरे यांची कोविड-19 ची चाचणी करण्यात आली. पण, सुदैवाने कोविडची चाचणी ही निगेटिव्ह आली आहे. तसंच मलेरिया आणि इतरही चाचण्या करण्यात आल्या आहे. पण, त्यांचेही रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहे. व्हायरल फिव्हर असल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. पण, कोरोनाच्या काळात खबरदारी म्हणून पुढील दोन ते तीन दिवस त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑन फिल्ड, जागेवरच नुकसानग्रस्तांना 11 धनादेश वाटप! कोरोनाच्या परिस्थितीत काळजी घेणे गरजेचं आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस त्यांना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. योग्य त्या उपचारानंतर अमित ठाकरे यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात येईल, असंही डॉक्टरांनी सांगितले आहे. अमित ठाकरे यांच्यावर पक्षात मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यानंतर राजकारणात ते सक्रीय झाले आहे. कोरोनाच्या काळात अमित ठाकरे यांनी वेगवेगळ्या मुद्यांवर मदत कार्य केले. आशा सेविकांचा प्रश्न असेल, डॉक्टरांनी फूट पॅकेटचे वाटप असेल, अशा अनेक मुद्यांवर अमित यांनी काम पाहिले होते. मुख्यमंत्री 'मातोश्री'तून बाहेर का पडत नाही? शरद पवारांनी दिले उत्तर... अलीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेतील 800 एकर भाग हा जंगल म्हणून घोषित केला आहे. त्याचबरोबर आरेतील मेट्रोचे कारशेड हे कांजूरमार्गला हलवण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयाबद्दल अमित यांनी आभार मानले होते. 'हा लोकांच्या संघर्षाचा विजय आहे. मी समजू शकतो आरे कारशेडसाठी आंदोलन करणारी लोकं किती आनंदी असतील. अनेकांनी आंदोलन करताना अंगावर केसेस घेतल्या होत्या. त्या सगळ्यांच्या लढ्याला यश आलं आहे', असं म्हणत अमित ठाकरे यांनी ठाकरे सरकारचे आभार मानले होते.

    तुमच्या शहरातून (मुंबई)

    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या