मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

ठाकरे कुटुंबातला भावुक क्षण, मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना फोन

ठाकरे कुटुंबातला भावुक क्षण, मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना फोन

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना फोन करून तब्येतीची विचारपूस केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना फोन करून तब्येतीची विचारपूस केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना फोन करून तब्येतीची विचारपूस केली.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 23 ऑक्टोबर : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray corona test positive)  यांच्या घरात कोरोनाने (corona) शिरकाव केला आहे. राज यांच्यासह त्यांच्या आई आणि बहिणीला कोरोनाची लागण झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांनी राज ठाकरे यांना फोन केला असून तब्येतीची विचारपूस केली आहे.

राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. त्यांच्यावर मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. त्यांचे बंधू आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संध्याकाळी राज ठाकरे यांना फोन केला. मुख्यमंत्र्यांनी राज यांच्या तब्येतीची विचारपूस केली.  त्याचबरोबर राज यांच्या आई आणि बहिण जयंवती ठाकरे देशपांडे यांच्या प्रकृतीचीही विचारपूस केली. ठाकरे कुटुंबातला हा भावनिक क्षण होता. राजकीय मतभेद दूर ठेवून दोन्ही भाऊ आज एकत्र आल्याचे पाहण्यास मिळाले.

सुंदरा मनामध्ये भरली'मधील अभ्याचं ते बिंग फुटलं ; समोर आला पडद्यामागील Video

दरम्यान, लीलावती हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, राज यांच्या आईंची तब्येत आता ठीक असून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहे. राज ठाकरे सध्या लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल आहे, त्यांच्यावर उपचार सुरू आहे. ताप कमी झाला आहे, खोकल्याचा कोणताही त्रास त्यांना नाही. श्वास घेण्यासाठीही कोणताही त्रास त्यांना जाणवत नाही. हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर आज रात्रीच त्यांना घरी सोडण्यात येणार आहे.

Amala Paul ने नागार्जुनसोबत लिपलॉक सीन देण्यासाठी ठेवली होती विचित्र अट

राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्री मधुवंती ठाकरे यांना कोविड-19 संसर्गाची लागण झाली आहे. सौम्य ताप आणि लक्षणं दिसून आल्यामुळे कोविड 19 संसर्गाची चाचणी करण्यात आली होती. त्यात राज ठाकरे यांच्या मातोश्री मधुवंती ठाकरे यांची चाचणी शुक्रवारी पॉझिटिव्ह आली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या आई आणइ मोठी बहिण जयवंती ठाकरे-देशपांडे अशा तिघांचे कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आले आहेत. विशेष म्हणजे, मार्च महिन्यात राज ठाकरे यांच्या आई आणि बहिण जयवंती ठाकरे-देशपांडे यांनी कोरोनाची लस घेतली होती. आज राज ठाकरे यांचीही कोरोनाची चाचणी करण्यात आली. त्यानंतर अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. दोघांचेही अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.

First published: