इमानचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय, इमानच्या बहिणीचा आरोप

इमानचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय, इमानच्या बहिणीचा आरोप

डॉक्टर इमानची कोणतीही काळजी घेत नाहीत, असा आरोप इमानची बहीण शायमा सेलिमने केला आहे.

  • Share this:

25 एप्रिल :  जगात सर्वात लठ्ठ महिला इमान अहमदवर सध्या मुंबईमध्ये उपचार सुरू असून ती सध्या खूप अजारी आहेत. शिवाय डॉक्टर तिची कोणतीही काळजी घेत नाहीत, असा आरोप इमानची बहीण शायमा सेलिमने केला आहे.

मुंबईतील सैफी हाॅस्पिटलमध्ये इमान अहमद वजन कमी करण्यासाठी  डॉ. मुफझ्झल लकडावाला यांच्याकडे उपचार घेत आहे. डॉक्टरांनी इमानवर योग्य पद्धतीने उपचार सुरू करतानाच तिचे वजन घटेल, असे दावे करण्यात आले होते. परंतु तिचे आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचा गंभीर आरोप शायमा यांनी केला आहे.

14 एप्रिलला केलेल्या व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये हाॅस्पिटलने इमानला हाॅस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर तिचं वजन केलं नसल्याचा तिने दावा केला आहे. 11 फेब्रुवारीला इमानला हाॅस्पिटलमध्ये आणल्यानंतर आतापर्यंत तिचं वजनच करण्यात आलेलं नाही. तसं असल्यास त्यांनी व्हिडिओसमोर ते सिद्ध करावं, असं आवाहनही शैम्मा यांनी केलं आहे.

दरम्यान, यासंबंधी हाॅस्पिटलने आपली बाजू मांडली असून आम्ही दोन आठवड्यांपुर्वीच इमान अहमद यांना पुन्हा इजिप्तला परत घेऊन जाऊ शकता, असं कळवलं होतं. मात्र तेव्हापासूनच शायमा यांनी हा व्हिडीओ पसरवत डॉक्टरांची बदनामी करत असल्याचं सांगितलं आहे.

सैफी हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वी 500 किलो वजन असणाऱ्या एमानवर बेरिएट्रिक शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यात तिचं वजन घटले आहे. 25 वर्षे इमान अंथरुणाला खिळली होती. ती मुंबईत आल्यावर तिच्यावर यशस्वी उपचार करण्यात यश आले आहे. आम्ही इजिप्तच्या दूतावासाच्या संपर्कात असून त्यांना इमानच्या प्रकृतीबाबत माहिती दिली जात असल्याचं हाॅस्पिटल प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.

First published: April 25, 2017, 2:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading