'त्या' पुलाच्या रूंदीकरणासाठी सेनेनं केली होती मागणी, प्रभूंनी 11.86 कोटीही दिले होते

'त्या' पुलाच्या रूंदीकरणासाठी सेनेनं केली होती मागणी, प्रभूंनी 11.86 कोटीही दिले होते

या पुलांची रुंदी वाढवण्यासाठी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत आणि राहुल शेवाळे यांनी तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंकडे मागणी केली होती.

  • Share this:

29 सप्टेंबर : मुंबईत आज सकाळी एलफिन्स्टन आणि परळ स्टेशनच्या पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत 22 जणांचा मृत्यू झालाय. मात्र, या पुलांची रुंदी वाढवण्यासाठी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत आणि राहुल शेवाळे यांनी तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंकडे मागणी केली होती.

त्यावेळी सुरेश प्रभू यांनी अरविंद सावंत आणि राहुल शेवाळे यांच्या मागणीची दखल घेतली पण तुर्तास निधी नसल्याचं सांगितलं होतं.  त्यानंतर याच ठिकाणी 2016 मध्ये नव्या पुलाला मंजुरी दिली याची प्रक्रिया अजूनही सुरूच आहे. खुद्द सुरेश प्रभूंनी या पुलासाठी 11. 86 कोटींचा निधी मंजूर केला होता.

याआधी अरविंद सावंत यांनी 2014 मध्ये माजी रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनाही पत्र लिहिलं होतं. त्यावेळी गौडा यांनी याकडे दुर्लक्ष केलं होतं.

सेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी 23 एप्रिल 2015 मध्ये पुन्हा सुरेश प्रभू यांनी पत्र लिहुन एलफिन्स्टन येथील पुलाची रूंदी वाढवण्यासाठी पत्रव्यवहार केला होता. मात्र, त्यावेळी निधी नसल्याचं कारण पुढे करण्यात आलं होतं.

कॅगचे रेल्वेच्या कारभारावर ताशेरे

दरम्यान, कॅगच्या रिपोर्टमध्ये रेल्वेच्या कारभारावर ताशेरे ओढण्यात आले. आयबीएन-लोकमतच्या हाती कॅगचा 2016 चा रिपोर्ट लागलाय.  रेल्वे स्थानकांवर पादचारी पुलांची कमतरता आहे आणि सध्या अस्तित्वात असलेले पुल अरुंद असल्याचं या अहवालात स्पष्ट नमूद करण्यात आलंय. तसंच  गेल्या 10 वर्षांपासून पादचारी पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिटच झालेलं नाही. पादचारी पूल 6 मीटर रुंद पाहिजेत असं रेल्वे बोर्डाचं परिपत्रक आहे. मात्र एलफिन्स्टन स्टेशनवरचा पूल फक्त साडेसहा फुटांचा  असल्याची बाब आता उजेडात आलीये.

उपनगरीय रेल्वेच्या मृत्यूंमध्ये 53 टक्के मृत्यू मुंबईत होतात तर 82 टक्के मृत्यू रेल्वेतून पडल्यामुळे किंवा धक्का लागून होतात अशी गंभीर बाबही समोर आलीये. त्यामुळे बुलेट ट्रेनचं स्वप्न पाहणाऱ्या सरकारचे डोळे आतातरी उघडतील का असा सवाल तमाम मुंबईकर विचारत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 29, 2017 10:09 PM IST

ताज्या बातम्या