Home /News /mumbai /

कल्याण ते एल्फिस्टन ठरला शेवटचा प्रवास

कल्याण ते एल्फिस्टन ठरला शेवटचा प्रवास

एल्फिस्टन रोड रेल्वे स्थानकात झालेल्या दुर्दैवी घटनेत कल्याणमध्ये राहणाऱ्या श्रद्धा वरपे या तरुणी चाही समावेश आहे.

29 सप्टेंबर : एल्फिस्टन रोड रेल्वे स्थानकात झालेल्या दुर्दैवी घटनेत कल्याणमध्ये राहणाऱ्या श्रद्धा वरपे या तरुणी चाही समावेश आहे. ती कल्याण पूर्व इथल्या खडेगोळवली परिसरात आपल्या आई वडील आणि दोन भावांसह राहत होती. श्रद्धा ही एल्फिस्टन इथल्या कामगार मंडळ कार्यालयात कामाला होती. तिचे वडील किशोर वरपे सुद्धा याच ऑफिसमध्ये कामाला आहेत. त्यांची ड्युटी आधीची असते. नेहमी प्रमाणे श्रद्धा ही ऑफिस ला जाण्यासाठी ब्रिज वरून येत असताना दुर्दैवी घटना घडली आणि तिला जीव गमवावा लागला. तिच्या आशा हृदयद्रावक मृत्यूने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. तिच्या कुटुंबियांना जबरदस्त मानसिक धक्का बसला असून परिसरातील सर्वच जण शोकमग्न अवस्थेत आहेत.
First published:

Tags: Elphinstone stampede, Kalyan, Shradha varpe, Shradha varpe dead

पुढील बातम्या