मयुरेशच्या कुटुंबियांना मदतीचा हात, 5 रुपयात वडापाव घेऊन करू शकतात मदत

हळदणकर कुटुंबियांच्या मदतीसाठी 'आपला वडापाव' हा एक सामाजिक उपक्रम राबवला जात आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Oct 11, 2017 06:23 PM IST

मयुरेशच्या कुटुंबियांना मदतीचा हात, 5 रुपयात वडापाव घेऊन करू शकतात मदत

11 आॅक्टोबर : एलफिन्स्टन स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत 29 जणांचा बळी गेलाय. या चेंगराचेंगरीत वरळी इथं राहणाऱ्या मयुरेश हळदणकर यांचा मृत्यू झालाय. मयुरेश हा कुटुबियांचा आधारस्तंभ होता. हळदणकर कुटुंबियांच्या मदतीसाठी आता हात पुढे सरसावले आहे.

हळदणकर कुटुंबियांच्या मदतीसाठी 'आपला वडापाव' हा एक सामाजिक उपक्रम राबवला जात आहे. दिनांक १४ आॅक्टोबर रोजी सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत 5 रुपयांत वडापाव विकून जमलेला निधी हळदणकर कुटुंबियांना दिला जाणार आहे. प्रशासनाकडून मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर झालीये पण ही मदत पोहोचेल तेव्हा पोहोचेल मात्र आपआपल्या परीने मदत पोहोचवण्यासाठी ही मदत दिली जाणार आहे.

तुम्ही यात सहभागीत होऊ शकतात.

दिनांक - 14 आॅक्टोबर 2017

स्थळ : सारथी हॉटेल समोर, स्वामी समर्थ मठा जवळ, ज. भा. मार्ग., एलफिन्सटन, मुंबई.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 11, 2017 06:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...