एलफिन्स्टन चेंगराचेंगरीत मृतांची संख्या 23 वर

एलफिन्स्टन चेंगराचेंगरीत मृतांची संख्या 23 वर

गंभीर जखमी झालेले सत्येंद्र कनोजिया यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय.

  • Share this:

30 सप्टेंबर : एलफिन्स्टन स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत मृतांचा आकडा 23 वर पोहोचलाय. गंभीर जखमी झालेले सत्येंद्र कनोजिया यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय.

शुक्रवारी सकाळी 9.30 च्या सुमारास एलफिन्स्टन आणि परळ स्टेशनला जोडलेल्या पादचारी पुलावर चेंगराचेंगरी झाली होती. या दुर्घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला होता. तर 39 जण जखमी झाले होते. केईएम हाॅस्पिटलमध्ये जखमींवर उपचार सुरू आहे. आज दुपारी उपचारादरम्यान जखमी सतेंद्र कनोजिया यांचा मृत्यू झालाय. अजूनही जखमींवर उपचार केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान,  मुंबईत लोकसंख्या वाढली पण सोयीसुविधा वाढल्या नाही अशी कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी पूर्ण खबरदारी घेतील जाईल अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 30, 2017 05:25 PM IST

ताज्या बातम्या