Home /News /mumbai /

एल्गार परिषद प्रकरणी अटकेत असणाऱ्या वरवरा राव यांना Corona

एल्गार परिषद प्रकरणी अटकेत असणाऱ्या वरवरा राव यांना Corona

एल्गार परिषद (Elgar) प्रकरणी अटकेत असणारे कवी-कार्यकर्ते वरवरा राव यांना Coronavirus ची लागण झाली आहे. माओवादी चळवळीशी संबंधित असण्याचा आरोप राव यांच्यावर आहे.

    मुंबई, 16 जुलै : एल्गार परिषद (Elgar) प्रकरणी अटकेत असणारे कवी-कार्यकर्ते वरवरा राव यांना Coronavirus ची लागण झाली आहे. माओवादी चळवळीशी संबंधित असण्याचा आरोप राव यांच्यावर आहे. मुंबईच्या कारागृहात असताना त्यांची तब्येत बिघडली. त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डिसेंबर 2017 मध्ये भीमा कोरेगावला झालेल्या दंगलींना एल्गार परिषदेमुळे प्रोत्साहन मिळालं, असा आरोप आहे. तेलुगू कवी आणि कार्यकर्ते असलेल्या राव यांना पोलिसांनी अटक केली होती. कारागृहात असताना त्यांची प्रकृती बिघडली. त्यांच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना आता मुंबईच्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये हलवण्याची शक्यता आहे. वरवरा राव 81 वर्षांचे आहेत. सोमवारी त्यांनी मुंबईच्या उच्च न्यायालयता तात्पुरत्या जामिनासाठी अर्ज केला होता. तब्येत खालावलेली असल्याने जामीन मिळावा, अशी त्यांची विनंती होती. पण जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Varvara rao

    पुढील बातम्या