S M L

आता सीएसटी नव्हे 'सीएसएमटी' आणि 'एलफिन्स्टन रोड' होणार 'प्रभादेवी'

मुंबईतील दोन रेल्वे स्थानकांची नावं इतिहासजमा होणार आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि 'एलफिन्स्टन रोड' या दोन रेल्वे स्टेशनच्या नामांतरच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.

Sachin Salve | Updated On: May 6, 2017 09:23 PM IST

आता सीएसटी नव्हे 'सीएसएमटी' आणि 'एलफिन्स्टन रोड' होणार 'प्रभादेवी'

06 मे : मुंबईतील दोन रेल्वे स्थानकांची नावं इतिहासजमा होणार आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि 'एलफिन्स्टन रोड' या दोन रेल्वे स्टेशनच्या नामांतरच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.

मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस अर्थात सीएसटीचा नामविस्तार आणि एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकाचे नाव बदलून प्रभादेवी करण्याचा प्रस्ताव विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात डिसेंबर 2016 मध्ये मंजूर केला होता. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रस्ताव मांडला होता.

आता या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिलीये. त्यामुळे आता  पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावरील एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘प्रभादेवी रेल्वे स्थानक’ असे होणार आहे. तसंच मध्य रेल्वेचे मुंबईतील शेवटचे स्थानक आणि मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतील सर्वात गजबजलेले स्थानक, सीएसटी अर्थात ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस’च्या नावामध्ये ‘महाराज’ हा शब्द समाविष्ट करून ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ असा नामविस्तार होणार आहे. 1961 साली दिवाकर रावते महापौर असतांना त्यावेळी हा प्रस्ताव मांडला गेला होता. अखेर दोन दशकांनंतर हा प्रस्ताव मंजूर झालाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 6, 2017 09:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close