आता 'एलफिन्स्टन रोड' नव्हे प्रभादेवी !

आता 'एलफिन्स्टन रोड' नव्हे प्रभादेवी !

मुंबईतील 'एलफिन्स्टन रोड' या रेल्वे स्थानकाचं नाव आता इतिहासजमा झालंय.

  • Share this:

04 जुलै : मुंबईतील 'एलफिन्स्टन रोड' या रेल्वे स्थानकाचं नाव आता इतिहासजमा झालंय. यापुढे एलफिन्स्टन रोडचं नाव प्रभादेवी रेल्वे स्थानक असं असणार आहे.

मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस अर्थात सीएसटीचा नामविस्तार आणि एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकाचे नाव बदलून प्रभादेवी करण्याचा प्रस्ताव विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात डिसेंबर 2016 मध्ये मंजूर केला होता. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रस्ताव मांडला होता.

अलीकडेच या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली होती. केंद्राची मंजुरी मिळाल्यानंतर आता पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावरील एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘प्रभादेवी रेल्वे स्थानक’ असं करण्यात आलंय. तसंच या आधी मध्य रेल्वेचे मुंबईतील शेवटचे स्थानक आणि मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतील सर्वात गजबजलेले स्थानक, सीएसटी अर्थात ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस’च्या नावामध्ये ‘महाराज’ हा शब्द समाविष्ट करून ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ असं बदलण्यात आलंय.

First published: July 4, 2017, 6:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading