Home /News /mumbai /

ऐन सणासुदीच्या तोंडावर महाराष्ट्रावर वीज संकट; कोळशाच्या तुटवड्यामुळे 13 यूनिट बंद

ऐन सणासुदीच्या तोंडावर महाराष्ट्रावर वीज संकट; कोळशाच्या तुटवड्यामुळे 13 यूनिट बंद

MSEDCL नं ग्राहकांना मागणी आणि पुरवठा यांचं संतुलन राखण्यासाठी सकाळी 6 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 6 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत वीजेचा कमी वापर करण्याचं आवाहन केलं आहे

    मुंबई 11 ऑक्टोबर : कोळशाच्या संकटामुळे (Shortage of Coal in Power Plant) महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित म्हणजेच महावितरणाला (MSEDCL) वीज पुरवठा करणारे वीज केंद्रांचे एकूण 13 युनिट रविवारी बंद झाले. यामुळे राज्यात 3330 मेगावॅट वीज पुरवठा ठप्प (Electricity Crisis in Maharashtra) झाला आहे. यामुळे म्हणजे ग्राहकांना कमी वीज वापरण्याचे आवाहन केले जात आहे. राजधानी दिल्लीवर वीज कपातीचं महासंकट? कोळशाच्या तुटवड्यामुळे प्रशासन चिंतेत MSEDCL नं ग्राहकांना मागणी आणि पुरवठा यांचं संतुलन राखण्यासाठी सकाळी 6 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 6 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत वीजेचा कमी वापर करण्याचा सल्ला दिला आहे. चंद्रपूर, भुसावळ आणि नाशिकचे 210-210 मेगावॅट, पारस -250 मेगावॅट आणि भुसावळ आणि चंद्रपूरचे 210-210 मेगावॅट युनिट बंद करण्यात आले आहेत.याशिवाय पोस्टल गुजरात पॉवर लिमिटेड (गुजरात) चे 640 मेगावॅटचे 4 संच आणि रतन इंडिया पॉवर लिमिटेड (अमरावती) चे 810 मेगावॅटचे 3 संच बंद आहेत. सध्या, विजेची मागणी आणि पुरवठा यांच्यातील 3330 मेगावॅटचे अंतर भरण्यासाठी खुल्या बाजारातून वीज खरेदी केली जात आहे. देशभरात विजेची मागणी वाढल्यामुळे विजेची खरेदी किंमतही महाग होत आहे. खुल्या बाजारातून 13.60 रुपये प्रति युनिट दराने 700 मेगावॅट वीज खरेदी केली जात आहे. रविवारी सकाळी 900 मेगावॅट वीज रिअल टाइम व्यवहारांद्वारे 6.23 रुपये प्रति युनिट दराने खरेदी केली गेली. याव्यतिरिक्त, कोयना धरणाद्वारे तसेच इतर लहान जलविद्युत प्रकल्प आणि अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांद्वारे वीज पुरवली जात आहे. राज्यातील वाढत्या तापमानामुळे विजेची मागणीही वाढली आहे, तर कोळशाचा तुटवडा तीव्र होत आहे. खाकीतले देवदूत: 80 वर्षांच्या आजींना उचलून पोहोचवलं देवीच्या मंदिरापर्यंत, VIDEO शनिवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून सांगितले की, राजधानीत फक्त एका दिवसाचा वीज पुरवठा केला जाऊ शकतो, एवढाच कोळसा शिल्लक आहे. मात्र, केंद्रीय मंत्री आर.के. यांनी कोळशाचा तुटवड्याच्या बातम्या खोट्या असल्याचं म्हटलं. यानंतर, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केंद्रीय मंत्र्यावर पलटवार केला आणि त्यांच्या दाव्याला चुकीचे म्हटलं. मनीष सिसोदिया म्हणाले की, केंद्र सरकार आता निमित्त शोधत आहे, हे केंद्रीय मंत्र्याच्या वक्तव्यावरून स्पष्ट दिसत आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Electricity, Electricity cut

    पुढील बातम्या