विधानपरिषद निवडणुकीचं बिगुल फुंकलं, मतदान तारखेचीही झाली घोषणा

विधानपरिषद निवडणुकीचं बिगुल फुंकलं, मतदान तारखेचीही झाली घोषणा

उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीला 28 मे रोजी 6 महिने पूर्ण होत आहेत.

  • Share this:

मुंबई, 1 मे : राज्यासह देशभरात कोरोनाचं संकट असताना महाराष्ट्रात राजकीय पेच निर्माण झाला होता. कारण कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसलेल्या उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीला आता 28 मे रोजी 6 महिने पूर्ण होत आहेत. अशातच काही वेळापूर्वी दिल्लीत झालेल्या बैठकीत केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक घेण्यास परवानगी दिली. त्यानंतर आता ही निवडणूक 21 मे रोजी मुंबईत घेण्यात येणार असल्याची घोषणाही करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणुका घेण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने परवानगी दिली. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर योग्य प्रकारची खबरदारी घेवून ही निवडणूक घ्यावी, अशा सूचना निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्या आहेत. आमदारकीवरून राजकीय पेच निर्माण झाला असतानाच निवडणूक आयोगाने ही परवानगी दिल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्राच्या राज्यपालांनी निवडणूक आयोगाला 9 जागांवर निवडणुका घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर महाराष्ट्रातील 9 विधानपरिषद जागांवर प्रलंबित असलेल्या निवडणुकांशी संबंधित बैठक घेण्यात आली. महाराष्ट्राच्या मुद्यावर निवडणूक आयोगाची दिल्लीत मोठी बैठक सुरू होती. या बैठकीत अमेरिकेवरून व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मुख्य निवडणूक आयुक्त सामील झाले होते. दोन्ही निवडणूक आयुक्त निवडणूक आयोगात हजर होते.

हेही वाचा - पुणेकरांना दिलासा मिळणार? लॉकडाऊनबाबत बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता

या बैठकीत महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणुका घेण्यास परवानगी देण्यात आली. खरंतर, उद्धव ठाकरे 28 मे पर्यंत आमदार झाले नाहीत तर त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची बैठक महत्त्वपूर्ण मानली जात होती.

संपादन - अक्षय शितोळे

First published: May 1, 2020, 12:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading