भांडूप पोटनिवडणुकीसाठी आज मतदान

काँग्रेसच्या स्थानिक नगरसेविका प्रमिला पाटील यांचं निधन झालं.त्यामुळे इथली नगरसेवकाची जागा रिक्त झाली.त्यासाठी ही पोट निवडणुक होते आहे. पण या पोटनिवडणुकीत चूरस सुरू आहे ती शिवसेना विरुद्ध भाजपच्या उमेदवारांमध्येच.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Oct 11, 2017 11:36 AM IST

भांडूप पोटनिवडणुकीसाठी आज मतदान

मुंबई,11 ऑक्टोबर: मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक ११६ मधल्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होतंय. मुंबई महापालिकेत शिवसेना आणि भाजप यांच्यात संख्याबळात अत्यंत कमी अतंर आहे. त्यामुळे आपलं संख्याबळ मजबूत करण्यासाठी, दोन्ही पक्षांनी भांडूप पोट निवडणुकीत आपली ताकद पणाला लावली आहे.

काँग्रेसच्या स्थानिक नगरसेविका प्रमिला पाटील यांचं निधन झालं.त्यामुळे इथली नगरसेवकाची जागा रिक्त झाली.त्यासाठी ही पोट निवडणुक होते आहे. पण या पोटनिवडणुकीत चूरस सुरू आहे ती शिवसेना विरुद्ध भाजपच्या उमेदवारांमध्येच. भांडूपच्या ११६ वॉर्डात आता एकुण सात उमेदवार रिंगणात आहेत. या पोट निवडणुकीत २९ मतदान केंद्रांवर ३८ हजार १०५ मतदार आहेत. त्यापैकी किती जण आपला हक्क बजावत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या उपप्रचारप्रमुखाला भांडूपमध्ये मारहाणही करण्यात आली होती.

आज होणाऱ्या निवडणुकीचा उद्या निकाल आहे. आता या पोटनिवडणुकीत शिवसेना भाजपपैकी कोणी बाजी मारतं की दुसरंच कोणी गड जिंकतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 11, 2017 11:36 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...