विधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक

विधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक

स्थानिक स्वराज्य संस्थांवर आपले वर्चस्व राहावे, यासाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत.

  • Share this:

मुंबई, 21 एप्रिल : विधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक होणार आहे तशी घोषणा  केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. तर 24 तारखेला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीमुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांवर आपले वर्चस्व राहावे, यासाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. या निवडणुकीत सत्ताधारी भाजप आणि शिवसेना यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे.

31 मे रोजी अनिल तटकरे यांचा कार्यकाळ पुर्ण होतोय. त्याचबरोबर जयंत जाधव, मितेश बांगडिया, अब्दुल दुराणी, प्रविण पोटे आणि दिलीप देशमुख यांचा कार्यकाल 21जूनला पुर्ण होतोय.

दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी करण्याबाबत दोन्ही पक्षाच्या नेत्यांची चर्चा सुरू केली आहे, आघाडीबाबत दोन्ही पक्ष सकारात्मक आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रदेश अध्यक्ष सुनिल तटकरे यांनी दिली.

सूत्राच्या माहितीनुसार, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कोकण, नाशिक, परभणी आणि उस्मानाबाद लातूर या ठिकाणी जागापैंकी काही जागा मिळाव्यात अशी मागणी केली आहे असं समजतंय. आज राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी फोनवरून चर्चा केली. याबाबत पुढील तीन चार दिवसात काही ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे.

 कोणत्या जागांसाठी निवडणूक होतेय

21 मे रोजी मतदान, 24 मे रोजी मतमोजणी

- नाशिक (जयंत जाधव)

- कोकण

- अमरावती (प्रविण पोटे)

- परभणी-हिंगोली

- उस्मानाबाद-बीड-लातूर

- वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 21, 2018 05:17 PM IST

ताज्या बातम्या