Home /News /mumbai /

भाजपच्या पराभवानंतर अमृता फडणवीस यांची शाब्दिक युद्धात उडी; म्हणाल्या...

भाजपच्या पराभवानंतर अमृता फडणवीस यांची शाब्दिक युद्धात उडी; म्हणाल्या...

विधान परिषदेच्या 6 जागांवर झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीनं (Mahavikas Aghadi) जोरदार टक्कर देत भाजपचा (BJP) पराभव केला आहे.

    मुंबई, 4 डिसेंबर :  विधान परिषदेच्या 6 जागांवर झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीनं (Mahavikas Aghadi) जोरदार टक्कर देत भाजपचा (BJP) पराभव केला आहे. या निवडणुकीच्या निकालानंतर (Election Result) महाविकास आघाडीतील नेते व भाजपा यांच्यात चांगलच शाब्दिक युद्ध रंगलं आहे. आता या शाब्दिक युद्धात माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांनीही उडी घेतली आहे. राज्यातील विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. भाजपला पुणे, नागपूर या पारंपरिक मतदारसंघासह औरंगाबादमध्येही दारुण पराभवाचा सामना करावा लागला. आता या अभूतपूर्व यशानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजपाची टर उडवली जात आहे. याचदरम्यान ''वाईट सुरुवातीचा शेवट चांगला असतो'', असं ट्विट अमृता फडणवीसांनी केलं आहे. भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यात जी शाब्दिक चकमक घडत आहे. यात कुणी कोणाला काय म्हणाले आणि कोणाची सरशी झाली ते पाहूयात.... "असेल हिंमत तर एक एकट्याने लढा.."- चंद्रकांत पाटलांचे आव्हान पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीत राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्रितपणे आमच्याशी लढत दिली. त्यामुळे निकाल आमच्या विरोधात गेला. असं असलं तरी भाजपने या तिन्ही पक्षांना कडवी लढत दिली आहे. म्हणून निकालामध्ये धक्कादायक असं काहीही नाही. भाजपाला किमान धुळे, नंदुरबार मतदार संघात विजय मिळवता आला. पण शिवसेनेचं काय? असा खोचक प्रश्नही चंद्रकांत पाटलांनी विचारला आहे. माझं तिन्ही पक्षांना थेट आव्हान आहे, हिंमत असेल तर एक एकट्याने आमचा सामना करावा, असंही चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले. एकटं लढायचं की आघाडी करून हे आमचे वरिष्ठ ठरवतील- उपमुख्यमंत्री अजित पवार आम्ही आघाडी करून लढायचे की एक एकट्याने हा निर्णय आघाडी पक्षातील वरिष्ठ नेते ठरवतील. आम्हाला कुणी बिन कामाचा सल्ला देण्याची काहीही गरज नाही, असा पलटवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर केला. आमच्या वेगळे लढण्याने जर विरोधकांचा फायदा होणार असेल तर तसे अजिबात होता कामा नये, असं अजित पवार म्हणाले.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Amruta fadanvis, BJP

    पुढील बातम्या