07 डिसेंबर: नारायण राणेंना उमेदवारी मिळणार का, या चर्चेमुळे गाजलेली विधान परिषदेची निवडणूक आज पार पडणार आहे. भाजपकडून प्रसाद लाड आणि काँग्रेसकडून दिलीप माने रिंगणात उतरले आहेत.यात प्रसाद लाड यांचा विजय जवळपास निश्चित समजला जातोय.
नारायण राणेंनी विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यावर एक जागा रिक्त झाली होती. भाजपकडून उमेदवारी कुणाला मिळणार, याबाबत अनेक दिवस सस्पेन्स निर्माण झाला होता. शेवटी राणेंचा पत्ता कट करून प्रसाद लाड यांना संधी देण्यात आली. यामुळे शिवसेनेचाही पाठिंबा लाड यांना मिळाला. सेनेनं तसं जाहीर केलं होतं. हा पाठिंबा आमदारांच्या मतदानात रुपांतरित होतो का, हे आज कळेल.
आज विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे. या निवडणूकीत भाजपकडून प्रसाद लाड तर कॉंग्रेसकडून माजी आमदार दिलीप माने हे रिंगणात आहेत. नारायण राणे यांनी विधान परिषदेचा राजीनामा दिल्यानंतर त्यांची जागा रिक्त झाली. त्या रिक्त जागेसाठी ही निवडणूक होते आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा