नाट्यसंमेलनाची अध्यक्ष निवड लांबणीवर

नाट्यसंमेलनाची अध्यक्ष निवड लांबणीवर

नाट्य परिषदेच्या कार्यकारिणी समितीचा कार्यकाळ संपत आला आहे. डिंसेबरपर्यंत नवी कार्यकारिणी अस्तित्वात येणार आहे. ही नवी कार्यकारिणी आल्याशिवाय नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षाची निवड होऊ नये असा सूर या बैठकीत उमटला

  • Share this:

मुंबई, 29 ऑक्टोबर: 98 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत आज मुंबईत झालेल्या बैठकीत कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नाही. नाट्यसंमेलनाध्यक्षाच्या निवड प्रक्रिया लांबणीवर पडलीय.

नाट्य परिषदेच्या कार्यकारिणी समितीचा कार्यकाळ संपत आला आहे. डिंसेबरपर्यंत नवी कार्यकारिणी अस्तित्वात येणार आहे. ही नवी कार्यकारिणी आल्याशिवाय नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षाची निवड होऊ नये असा सूर या बैठकीत उमटला. त्यामुळेच नाट्यपरिषदेच्या निवडणुका होऊन नवी कार्यकारिणी अस्तित्वात आल्यावरच नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षाच्या निवडीची घोषणा होण्याची शक्यता आहे. यंदा नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ अभिनेत्री किर्ती शिलेदार, लेखक श्रीनिवास भणगे आणि अभिनेते आणि लेखक सुरेश साखवळकर यांची नावं चर्चेत आहेत.तसंच नाट्य संमेलन कुठे आणि कधी होणार याबाबतही कुठलेच निर्णय घेण्यात आलेले नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 29, 2017 05:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading