Home /News /mumbai /

आपल्या फोटोवर अघोरी जादूटोणा प्रकारावर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

आपल्या फोटोवर अघोरी जादूटोणा प्रकारावर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

अलौकिक शक्तीची कृपा मिळविण्याच्या हेतूने एकनाथ शिंदे यांच्या जीवाला धोका व्हावा अथवा त्यांच्या शरीराला जीवघेण्या जखमा होवून दुखापत करण्याकरिता अनिष्ठ अघोरी प्रथांचा वापर करण्यात आला.

    मुंबई, 17 डिसेंबर : पुरोगामी महाराष्ट्राला हादरावून सोडणारी घटना पालघरमध्ये घडली आहे. शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) यांच्या फोटोवर अघोरी कृत्य करून जादूटोणा करण्याचा प्रकार समोर आला आहे. 'अशा प्रकारामुळे काहीही घडत नाही, लोकांनी त्यावर विश्वास ठेवू नये' अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली. न्यूज18 लोकमतशी बोलत असताना एकनाथ शिंदे यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 'मी देखील आताच बातमी बघितली, अशा अघोरी घटना होतात त्यावर विश्वास ठेवायची गरज नाही. अशा प्रवृत्ती आहेत त्यावर पोलिसांमार्फंत कारवाई केली आहे. अशा कृत्याने कोणतीही गोष्ट घडत नसते, समाजाला अशा पासून सावध राहिले पाहिजे' असं एकनाथ शिंदे म्हणाले. सडक्या बटाट्यांपासून तयार करत होते आकर्षक पाकिटातले चिप्स! पाहा PHOTO 'मुंबई हायकोर्टाने मेट्रो कारशेडचे काम थांबवण्याचे आदेश दिले आहे. हा निर्णय दुर्दैवी असाच आहे.  कोर्टाने असंही म्हटलं होतं की, या राजकारणामध्ये लोकांचे नुकसान होऊ नये, राजकारण करण्यापेक्षा लोकांच्या हितामध्ये लक्ष द्यायला पाहिजे. विरोधकांनी केवळ राजकारण करू नये, हा प्रकल्प काही व्यक्तीगत नाही. त्यामुले सर्वांनी समन्वयची भूमिका घेतली पहिजे' असा सल्लावजा टोलाही शिंदे यांनी भाजपला लगावला. 'विरोधक आदित्य ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. पण मेट्रो कारशेडचा निर्णय हा राज्य सरकारचा आहे, आदित्य ठाकरे यांचा एकट्याचा वैयक्तिक निर्णय नाही, लोकांच्या हिताचा निर्णय राज्य सरकार घेईल' असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्यांना यांना चपराक लगावली. काय आहे प्रकरण? पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील व जव्हार पोलीस स्टेशन हद्दीतील कऱ्हे तलावली येथील एका घरात तांदळामध्ये एकनाथ शिंदे यांचा फोटो ठेवून अलौकिक शक्तीची कृपा मिळविण्याच्या हेतूने एकनाथ शिंदे यांच्या जीवाला धोका व्हावा अथवा त्यांच्या शरीराला जीवघेण्या जखमा होवून दुखापत करण्याकरिता अनिष्ठ अघोरी प्रथांचा वापर करण्यात आला. कोल्हापुरात मगरीचा महिलेवर हल्ला! हात-पाय खाल्लेल्या अवस्थेत सापडला मृतदेह एकनाथ शिंदे यांच्या फोटो समोर अगरबत्ती पेटवून हळद, कुंकू, काळा बुक्का, लिंबू, सफेद कोंबडा यांचा वापर करून अघोरी जादूटोणा करणारे दोघांना स्थानिक गुन्हा शाखेने अटक केली आहे. अटक केलेली इसम हे अशा अघोरी जादूटोणा करून लोकांना फसवत असून त्यांच्याकडून पैसेही उकळत असल्याचे सांगितले जात आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या