नाराजी प्रकरणावर 'ठाकरे सरकार'मधल्या सर्वात पॉवरफुल मंत्र्याने दिली प्रतिक्रिया

नाराजी प्रकरणावर 'ठाकरे सरकार'मधल्या सर्वात पॉवरफुल मंत्र्याने दिली प्रतिक्रिया

नगरविकास खात्याचं विभाजन होऊन नगरविकास - 3 असं नवं खातं निर्माण केली जाणार असल्याची चर्चा आहे.

  • Share this:

मुंबई 14 जानेवारी : महाविकास आघाडीच्या मंत्र्यांमध्ये असलेल्या नाराजी नाट्याची चर्चा संपायचं नाव घेत नाहीयेत. आता ठाकरे सरकारमधले सर्वात पॉवरफुल मंत्री एकनाथ शिंदे हेच नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांच्या खात्यात विभाजन करून नवं मंत्रालय तयार करण्यात येणार असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे. शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात येईल अशीही चर्चा होती. या सगळ्या वादावर आता एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलीय. ते म्हणाले, मी कोणावरही नाराज नाही. काहीजण चुकीच्या बातम्या पसरवत आहेत.

शिंदे पुढे म्हणाले, सध्या मी नगरविकास विभागातील अधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहे. माझ्या मंत्रालयातील सर्व कामं व्यवस्थित सुरू आहेत. त्यामुळे नाराजीचा प्रश्नच येत नाही. दरम्यान या प्रकरणावर आता भाजपनेही प्रतिक्रिया दिलीय.

शिवेसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास विभागाचं विभाजन होऊन नगरविकास ३ विभाग निर्माण होत असल्याच्या चर्चेवरुन आता भाजप नेत्यांनीही टीका करायला सुरुवात केली आहे. हा प्रकार म्हणजे एकनाथ शिंदे यांचे पंख कापण्याचा प्रयत्न असल्याची टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिलीय.

VIDEO राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिकांच्या भावाची मुजोरी, कामगाराला केली मारहाण

ते म्हणाले, एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री होणार अशा चर्चा होती, मग उपमुख्यमंत्री होणार अशी चर्चा होती, मग नगरविकास मंत्री झाले. पण आता त्यातलीही खाती काढून घेणार आहेत. याचाच अर्थ शिंदे यांचे शिवसेनेत पंख छाटण्याचा प्रयत्न केला जातोय.

काय आहे नाराजी

एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास खात्याचं विभाजन होऊन नगरविकास - 3 असं नवं खातं निर्माण केली जाणार असल्याची चर्चा आहे. यात मेट्रो, नवी मुंबई विमानतळ, सिडको अशा अनेक महत्वाच्या प्रकल्पांची जबाबदारी असेल असंही सांगितलं जातेय. सध्या नगरविकास विभागाकडे ही सर्व खाती आहेत. ती खातीच गेली तर मग नगरविकास खात्याला काहीच अर्थ राहणार नाही असं बोललं जातंय.

जगातल्या सगळ्यात मोठ्या इमारतीवर पडली वीज, विश्वास बसणार नाही असा PHOTO व्हायरल

नगरविकास खात्याचं विभाजन करून ती खाती स्वत: मुख्यमंत्री घेतील किंवा आदित्य ठाकरे यांच्याकडे सोपवली जातील अशीही चर्चा आहे. या हालचालींमुळे शिंदे नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे.शिवसेनेत ठाकरे परिवारानंतर एकनाथ शिंदे सगळ्याच ताकदवान नेते समजले जातात. सत्तास्थापनेच्या नाट्यात शिवसेनेच्या आमदारांना एकत्रित ठेवण्यात शिंदे यांचा मोठा सहभाग होता. या संभाव्य बदलामुळे शिंदे गटात अस्वस्थता असल्याची चर्चा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 14, 2020 04:40 PM IST

ताज्या बातम्या