Home /News /mumbai /

अखेर एकनाथ शिंदेंचा पुढील प्लान ठरला; नव्या Video मुळे सत्तेच्या संभ्रमाला The End!

अखेर एकनाथ शिंदेंचा पुढील प्लान ठरला; नव्या Video मुळे सत्तेच्या संभ्रमाला The End!

एकनाथ शिंदेंचा नवा Video समोर आला आहे.

    मुंबई, 23 जून : बंडखोर आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा आणखी एक व्हिडीओ (Eknath Shinde Video Viral) समोर आला आहे. यात ते असं काही म्हणत आहेत, ज्यामुळे एकनाथ शिंदे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब होत आहे. यात ते आमदारांशी संवाद साधताना दिसत आहेत. याशिवाय एका आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाला आमचा पाठिंबा असल्याचंही सांगितलं आहे. काय म्हणाले एकनाथ शिंदे... - भाजपही महाशक्ती आहे, भाजपने पाकिस्तानला धडा शिकवलाय. -भाजप एक राष्ट्रीय पक्ष आहे. -त्यांनी मला सांगितलं की, हा निर्णय ऐतिहासिक आहे. -काही लागलं तर ते आपल्याला कमी करणार नाही, महाराष्ट्रातील राजकीय अपडेट.. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे 40 पेक्षा जास्त आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या गोटात जावून सहभागी झाले आहेत. हे सर्व आमदार आसामच्या गुवाहाटी येथील एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना आधी सुरतमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना एअर लिफ्टिंग करुन गुवाहाटीला नेलं गेलं. शिवसेनेच्या या बंडखोर आमदारांना भाजपचा पडद्यामागून पाठिंबा असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील भाजपचा सरकार अस्थितर करण्याचा प्रयत्न असल्याचं विधान केलं आहे. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेगळं विधान केलं आहे. शिवसेनेच्या बंडामागे भाजपचा हात दिसत नाही, असं अजित पवार म्हणाले आहेत.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Assam, Eknath Shinde, Mumbai, Shivsena

    पुढील बातम्या