मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

eknath shinde : एकनाथ शिंदे यांच्या मनात वेगळंच चाललंय? राज्यात येणार नवा पक्ष?

eknath shinde : एकनाथ शिंदे यांच्या मनात वेगळंच चाललंय? राज्यात येणार नवा पक्ष?

एकनाथ शिंदे यांच्या सोबत असलेले सर्व आमदार हे सतत निवडून येणारे आमदार आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची ही मोठी खेळी समजली जात आहे.

एकनाथ शिंदे यांच्या सोबत असलेले सर्व आमदार हे सतत निवडून येणारे आमदार आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची ही मोठी खेळी समजली जात आहे.

एकनाथ शिंदे यांच्या सोबत असलेले सर्व आमदार हे सतत निवडून येणारे आमदार आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची ही मोठी खेळी समजली जात आहे.

    मुंबई, 21 जून : शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे  (eknath shinde in surat)  यांनी जवळपास 29 आमदारांना घेऊन गुजरात गाठले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. पण, एकनाथ शिंदे यांच्या मनात काही तरी वेगळंच सुरू आहे. एकनाथ शिंदे कोणत्याही पक्षात जाणार नाही. तर नाराज आमदारांचा वेगळा गट स्थापन करणार किंवा वेगळा पक्ष तयार करणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे अचानक जवळपास 29 आमदारांना घेऊन सुरतमध्ये दाखल झाले आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकार कोसळणार अशी चर्चा रंगली आहे. पण एकनाथ शिंदे कोणत्याही पक्षात जाणार नाही.  नाराज आमदारांचा स्वतंत्र गट स्थापन करणार आहे. राष्ट्रपती निवडणूक होईपर्यंत सगळे आमदार उत्तर प्रदेश, गोवा आणि गुजरात येथे राहणार आहे.  निवडणूक झाल्यावर एकतर स्वतंत्र पक्ष स्थापन करणार अथवा भाजप मित्र पक्ष म्हणून लढणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तसंच एकनाथ शिंदे यांच्या सोबत असलेले सर्व आमदार हे सतत निवडून येणारे आमदार आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची ही मोठी खेळी समजली जात आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर ही वेळ का आली? एकनाथ शिंदे शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते आहेत. सर्व आमदारांचे प्रमुख असूनही त्यांनी प्रमख निर्णय प्रक्रियेतून नेहमी दूर ठेवलं जातं. हे कुणाच्या सांगण्यावरून केलं जात होतं. याचीही माहिती एकनाथ शिंदे यांना होती. तरीही कधी ना कधी न्याय मिळेल या आशेने ते पक्षात कार्यरत राहिले. मात्र राज्यसभा आणि विधान परीषद निवडणुकीची सर्व सूत्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्याकडे दिली आणि एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांमध्ये बंडाची ठिणगी पेटली. गेली अडीच वर्षे मनात धगधगणाऱ्या ज्वालामुखीचा अखेर आज स्फोट झाला. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करताना शिवसेना पक्षप्रमख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी सिचवलं होतं. तसं अधिकृत पत्रही राज्यपालांना देण्यात आलं होतं. मात्र शिवसेना नेते संजय राऊत आणि सुभाष देसाई यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाला विरोध केला होता. शिवसेना पक्षात आणखी एक नारायण राणे निर्माण होईल आणि मग तो पक्षाला डोईजड होईल. अशी कारणं देत उद्धव ठाकरे यांचे कान भरण्यात आले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री बनण्याचे रास्ता रोखला गेला. गेल्या अडीच वर्षात देखील पक्षातील प्रमुख निर्णय प्रक्रियेतून एकनाथ शिंदे यांना परस्पर दूर ठेवलं जात होतं. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे सर्वात बलाढ्य नेते आहेत. असं असूनही त्यांना मिळणारी सापत्नं वागणूक शिवसेनेच्या इतर आमदारांनाही खटकत होती. राज्यभरातील कुठलाही शिवसेना कार्यकर्ता, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी असो एकनाथ शिंदेकडे कोणतेही काम घेऊन आला तर तो खाली हाताने परत जात नाही. त्यामुळे शिवसेना पक्षात एकनाथ शिंदे सर्वाधिक लोकप्रिय मंत्री होते. विधिमंडळात सर्वाधिक आमदारांचे पाठबळ एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. एकनाथ शिंदे यांना जर शिवसेनेला जय महाराष्ट्र केला तर ते शिवसेनेचं आतापर्यंतचं सर्वाधीक मोठं राजकीय नुकसान असेल. असं राजकीय नुकसान जे राज ठाकरे, नारायण राणे, गणेश नाईक आणि छगन भुजबळ यांनीही शिवसेना सोडताना केलं नव्हतं. एकनाथ शिंदे यांच्यापुढील राजकीय पर्याय १) समर्थक आमदारांसोबत स्वतंत्र पक्ष निर्माण करणं. २) स्वतंत्र पक्ष निर्माण करून भाजपला बाहेरून पाठिंबा देऊन सत्ता स्थापनेचा प्रयत्नं होऊ शकतो. ३) दिवंगत आनंद दिघे यांच्या नावाने अथवा प्रेरणेने स्वतंत्र पक्ष निर्माण करणे. ४) एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसह भाजपमध्ये पक्ष प्रवेश करून पुन्हा निवडणुकीला सामोरं जाण्याचा पर्याय. ५) एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात समन्वय घडवून आणून पुन्हा एकदा शिवसेनेत सक्रिय होणं.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या