Home /News /mumbai /

मंत्रिमंडळ विस्ताराआधी दिल्लीत खलबतं, एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला जाणार

मंत्रिमंडळ विस्ताराआधी दिल्लीत खलबतं, एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला जाणार

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी दिल्लीत जाणार आहेत.

    नवी दिल्ली, 7 जुलै : महाराष्ट्राच्या राजकारणातील (Maharashtra Politics) एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री झाल्यानंतर आता पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या भेटीसाठी दिल्लीला (Delhi) जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील ही पहिली औपचारिक भेट होणार आहे. उद्या शुक्रवारी (8 जुलै) ही भेट होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराआधी एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदी यांच्यात ही भेट होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच उद्या 8 जुलैला रात्री 11 वाजता दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. ते शनिवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत दिल्लीत राहणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) देखील असण्याची शक्यता आहे. या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच त्यांच्या मुख्यमंत्री पदासाठी भाजपने पाठींबा दिला म्हणून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची देखील भेट घेणार आहेत. ('काळ चक्र फिरले', किरीट सोमय्यांसोबत एकाच मंचावर जाण्याबाबतच्या प्रश्नावर प्रताप सरनाईकांचं मोठं वक्तव्य) दरम्यान, शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) हा दोन टप्प्यात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे त्यातील पहिल्या टप्प्याचा विस्तार हा आषाढी एकादशीच्या (Ashadi Ekadashi) आधी होणार आहे. याचाच अर्थ येत्या 10 जुलैच्या आधी शिंदे सरकारच्या (Shinde Government) पहिल्या टप्प्प्याच्या विस्तारातील 8 ते 10 मंत्र्यांचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे. विशेष म्हणजे मंत्रीमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन एक आठवडा झाला आहे, पण अजूनही इतर मंत्र्यांचा शपथविधी झालेला नाही. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आता मोठी माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आषाढी एकादशीआधीच होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. रविवारी आषाढी एकादशी असल्यामुळे एकनाथ शिंदे पंढरपूरला शासकीय पुजेसाठी जाणार आहेत, त्याआधी म्हणजे शुक्रवार किंवा शनिवारी नवे मंत्री शपथ घेतील. पहिल्या टप्प्यामध्ये 8 ते 10 मंत्र्यांच्या शपथविधी होणार असल्याची माहिती आहे. यामध्ये शिवसेना आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा समावेश असेल. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सह्याद्री अतिथीगृहात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची चर्चा होणार आहे. राजभवनातील दरबार हॉलमध्ये शिंदे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या 40 आणि अपक्ष अशा जवळपास 50 पेक्षा जास्त आमदारांनी बंड केलं. आमदारांच्या या बंडामुळे राज्यातलं महाविकासआघाडी सरकार कोसळलं आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. एकनाथ शिंदे यांच्यासोबत मागच्या सरकारमधले 8 मंत्रीही सहभागी होते, त्यामुळे त्यांनाही नव्या मंत्रीमंडळात आपल्याला स्थान असेल अशी अपेक्षा आहे.
    Published by:Chetan Patil
    First published:

    Tags: Eknath Shinde, Maharashtra News, Narendra modi

    पुढील बातम्या