Home /News /mumbai /

शिंदे गटाच्या अडचणींत वाढ! शिवसेनेच्या कार्यकारिणी बैठकीत 3 मोठे ठराव मंजूर, ठाकरे म्हणाले..

शिंदे गटाच्या अडचणींत वाढ! शिवसेनेच्या कार्यकारिणी बैठकीत 3 मोठे ठराव मंजूर, ठाकरे म्हणाले..

शिवसेना प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. यावर आज पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक घेण्यात आली आहे. यामध्ये सर्व अधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्यात आले असून बैठकीत 3 मोठे ठराव मंजूर करण्यात आले आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 25 जून : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या कथित बंडखोरीमुळे राज्यातील सरकार धोक्यात (maharashtra political crisis) आलं आहे. दिवसेंदिवस एकनाथ शिंदे यांची ताकद वाढताना दिसत आहे. आता तर शिवसेना पक्षच ताब्यात घेतला जाण्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. यावर आज पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक घेण्यात आली आहे. यामध्ये सर्व अधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्यात आले असून बैठकीत 3 मोठे ठराव मंजूर करण्यात आले आहे. एकनाथ शिंदेंची ताकद वाढतेय एकनाथ शिंदे यांनी उपसभापती आणि राज्यपालांना पत्र पाठवले आहे. त्यात शिवसेनेच्या 37 आमदारांच्या पाठिंब्याने त्यांनी स्वतःची विधीमंडळ पक्षनेतेपदी वर्णी लावली आहे. शिंदे गटात सहभागी होण्यासाठी शिवसेनेचे आणखी तीन आमदार गुवाहाटीला पोहोचले आहेत. शिंदे गटाने आता शिवसेनेचं पक्ष चिन्ह 'धनुष्यबाण' ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू केल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता ठाकरे देखील सावध झाले आहेत. शिवसेनेच्या बैठकीत 3 मोठे ठराव मंजूर महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक मुंबईत सुरू आहे. शिवसेनेच्या या बैठकीत आज तीन मोठे ठराव मंजूर करण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेतील सर्व प्रकारचे निर्णय घेणारे सर्व अधिकारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडेच असतील, असे पहिल्या ठरावात म्हटले आहे. दुसरा प्रस्ताव - बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हे नाव कोणालाही वापरता येणार नाही. तिसरा प्रस्ताव- पक्षातील गद्दारांवर कारवाई करण्याचे अधिकार पक्षप्रमुखांनाही असतील. आतापर्यंत हे सर्व प्रस्ताव सर्वानुमते मान्य करण्यात आले आहेत. BREAKING : आता माफी नाही! शिवसेनेनं बजावला एकनाथ शिंदेंना समन्स बंडोबांवर कारवाई होणार? शिवसेना बंडखोरांवर पक्ष शिस्तंभंगाची कारवाई करण्याचे अधिकार शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांन राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत देण्यात आले आहेत. त्यामुळे आता बंडोबांवर कारवाईची टांगती तलवार आहे. शिवसेना कार्यकारणीची बैठक संपल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी बंडखोरांना पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली. परंतु, अरविंद सावंत यांनी पदाधिकाऱ्यांना समजावले की, आपण कारवाईचे सर्वाधिकार पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंना दिलेत. ते निर्णय घेतील. शिवसेना कार्यकारिणीत उपस्थितांनी गद्दाराना परत घेऊ नका अशी मागणी उद्धव ठाकरेंना केली. यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी त्यांना परत घेणारच नाही असे बोलले. ठाकरेंकडून कारवाईचा बडगा विशेष म्हणजे, बंड पुकारल्यानंतर पक्षाने आमदारांवर कारवाईचा बडगा उगारायला सुरूवात केली. सर्वात आधी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं गटनेतेपद काढून घेतलं, त्यानंतर शिवसेनेचे प्रतोद सुनिल प्रभू (Sunil Prabhu) यांनी शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) आणि महेश शिंदे (Mahesh Shinde) यांना नोटीस पाठवली होती. या नोटीसीनुसार, 22 जून रोजी संध्याकाळी 5 वाजता वर्षा निवासस्थानी शिवसेनेची बैठक बोलावण्यात आली आहे, या बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश या नोटीसमध्ये देण्यात आले होते. पण, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात केली आणि सुनील प्रभू यांनी आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत, असा दावा केला होता. त्यानंतर आता एकनाथ शिंदेंना नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसीला एकनाथ शिंदे कसं उत्तर देता हे पाहण्याचे ठरणार आहे.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Eknath Shinde, Uddhav thacakrey

    पुढील बातम्या