... आणि एकनाथ शिंदेंनी टोलवरून फुकटच सोडल्या गाड्या

काल सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी काल चक्क टोल नाक्यावरून फुकटात गाड्या सोडायला सुरूवात केली.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Dec 30, 2017 10:16 AM IST

... आणि एकनाथ शिंदेंनी टोलवरून फुकटच सोडल्या गाड्या

30 डिसेंबर: टोल नाक्यावरच्या गर्दीमुळे ट्रॅफिक होणं हे आता रोजचंच झालं आहे. पण याला कंटाळून काल सार्वजनिक बांधकाम मंत्री  यांनी काल चक्क टोल नाक्यावरून फुकटात गाड्या सोडायला सुरूवात केली.

तर झालं असं की  सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे ठाण्याहून मुंबईकडे यायला निघाले होते. त्यांना आनंदनगर टोलनाक्यावर ट्रॅफिक लागलं. त्यामुळे एकनाथ शिंदे वैतागले. त्यांनी स्वतःची गाडी सोडली. आणि टोलबूथवर जाऊन गाड्या फुकटात सोडायला सुरूवात केली.

सामान्य लोकांनाही या टोलनाक्यावरून अशाच ट्रॅफिकला तोंड द्यावं लागतं. आणि असं दररोजच  तोंड द्यावं लागतं त्यांचे हाल मंत्रिमहोदयांना दिसत नाहीत का, असा प्रश्नही विचारला जातोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 30, 2017 10:16 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...