Home /News /mumbai /

...तर आजही वेळ आली नसती, उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर एकनाथ शिंदे थेट बोलले

...तर आजही वेळ आली नसती, उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर एकनाथ शिंदे थेट बोलले

 उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळे आम्हाला त्याचा आनंद नाही. जी काही परिस्थिती उद्भवली होती, जे आमदार आमच्यासोबत आहे

उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळे आम्हाला त्याचा आनंद नाही. जी काही परिस्थिती उद्भवली होती, जे आमदार आमच्यासोबत आहे

उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळे आम्हाला त्याचा आनंद नाही. जी काही परिस्थिती उद्भवली होती, जे आमदार आमच्यासोबत आहे

    मुंबई, ३० जून : 'उद्धव ठाकरे यांनी राजीनामा (uddhav thackeray resigns as cm) दिल्यामुळे आम्हाला त्याचा आनंद नाही.आमच्याकडे ५० आमदारांचे पाठबळ आहे, आम्ही मतदारसंघातील कामांबद्दल नेहमी सांगितलं होतं. त्यावेळी जर निर्णय घेतला असता तर आजही वेळ आली नसती, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी दिली. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अखेर कोसळले आहे. आता भाजपकडून सरकार स्थापनेचा दावा केला जाणार आहे. एकनाथ शिंदे आ हे गोव्यातून मुंबईकडे निघाले आहे. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर आपली प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळे आम्हाला त्याचा आनंद नाही. जी काही परिस्थिती उद्भवली होती, जे आमदार आमच्यासोबत आहे. त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये जे काही वाईट अनुभव होते. त्याबद्दल त्यांना सांगितले होते. त्यांनी जर आधी निर्णय घेतला असता तर आज ही वेळ आली नसती. त्यांनी राजीनामा दिला त्याचा आम्हाला बिल्कुल आनंद नाही. त्यांच्याबद्दल कालही आदर होता आणि आज आदर आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले, मी शिवसेनेचा नेते आहे. आमच्याकडे ५० आमदारांचे पाठबळ आहे. सरकार स्थापनेची जी काही प्रक्रिया आहे त्याचे अधिकारी मला आमदारांनी दिले आहे. मी मुंबईमध्ये चाललो आहे. मुंबईमध्ये गेल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होणार आहे. त्यानंतर निर्णय होणार आहे. राज्यपाल महोदय यांना भेटणार आहे. त्या भेटीनंतर आमची पुढील रणनीती ठरणार आहे. देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेणार आहे, असंही शिंदे यांनी सांगितलं. दरम्यान, आज सकाळी एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करून फडणवीस सरकारमधील मंत्रिमंडळाच्या खातेवाटपावरून सुरू असलेल्या बातम्यांवर आवाहन केलं. मात्र, 'भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका' असं आवाहन शिंदे यांनी केलं आहे. 'वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण, महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामे हाच आमचा फोकस'असंही शिंदेंनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान,शिवसेना नेते एकनाथ शिंदे त्यांच्या काही प्रमुख आमदारांसह आज दुपारी मुंबईला रवाना होणार आहे. मुंबईत महत्वाची बैठक करून परत गोव्याला जाणार आहे.बाकी आमदार हे गोव्यातच थांबणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या