Home /News /mumbai /

महाविकास आघाडीत शिवसेना आमदारांसोबत नेमकं काय घडलं? खदखद अखेर बाहेर, एकनाथ शिंदेंनी शेअर केला VIDEO

महाविकास आघाडीत शिवसेना आमदारांसोबत नेमकं काय घडलं? खदखद अखेर बाहेर, एकनाथ शिंदेंनी शेअर केला VIDEO

आम्हाला शिवसेना आमदारांना मतदारसंघातील कामांसाठी ५० - ५५ कोटीचा निधी दिला जात होता. तर राष्ट्रवादीच्या आमदारांना ७००-८०० कोटींचा निधी दिला जात होता, असं या आमदाराने सांगितलं

    मुंबई 25 जून : महाविकास आघाडीचं सरकार सध्या धोक्यात आहे. शिवसेनेतील अनेक आमदारांनी बंड पुकारलं असून 38 शिवसेना आमदार आणि काही अपक्ष आमदार सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीमध्ये आहेत. आमदारांनी हा निर्णय का घेतला, याची अनेक कारण आतापर्यंत स्वतः एकनाथ शिंदे आणि इतर काही आमदारांनी सांगितली आहेत. अशात आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde New Tweet) यांनी आपल्या ट्विटरवरुन आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात कोरेगाव, जिल्हा सातारा येथील शिवसेना आमदार महेश शिंदे (Rebel MLA Mahesh Shinde) यांनी आक्रमक भूमिका घेण्यामागचं कारण सांगितलं आहे. यातील एक प्रसंग सांगताना महेश शिंदे म्हणाले, की सर्व शिवसेना आमदारांची वर्षा निवास्थीन बैठक सुरू होती. आम्ही मुख्यमंत्र्यांना सर्व अधिकाऱ्यांसमोर त्यांनी आम्हाला किती पैसे मतदारसंघात विकासकामांसाठी दिले त्याच्या आकड्यांची माहिती विचारली. त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर चुकीचे आकडे दिले. यानंतर आम्ही खरे आकडे मुख्यमंत्र्यांना दाखवल्यावर तेदेखील अचंबित झाले. त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही आणि राष्ट्रवादी नेत्यांनी आमचा विश्वासघात केला आहे. मात्र या घटनेनंतरही त्यात काहीच बदल झाला नाही. आम्हाला शिवसेना आमदारांना मतदारसंघातील कामांसाठी ५० - ५५ कोटीचा निधी दिला जात होता. तर राष्ट्रवादीच्या आमदारांना ७००-८०० कोटींचा निधी दिला जात होता. शिवसेना आमदारांच्या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या आम्ही पाडलेल्या उमेदवारांना आमच्यापेक्षा डबल किंवा त्यापेक्षाही जास्त विकासासाधी निधी दिला जात होता. आम्हाला कोणत्या कार्यक्रमांना बोलावलं जात नव्हतं. आमच्या तीन बैठका मुख्यमंत्र्यांसोबत झाल्या. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की कसल्याही परिस्थिती यात सुधारणा होईल. बऱ्याच गोष्टींना मुख्यमंत्र्यांनी स्टे दिला. मात्र तोही उपमुख्यमंत्र्यांनी मानला नाही आणि मुख्यंमंत्र्यांच्या स्टेला केराची टोपली दाखवून आमच्या मतदारसंघातील विरोधकांची विकासकामं केली आणि उद्घाटनंही केली. हे सातत्याने सुरू राहिलं. त्यामुळे अखेर हा निर्णय घ्यावा लागला, असं महेश शिंदे यांनी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Eknath Shinde, Shivsena

    पुढील बातम्या